Apple Sales Decline : ॲपल कंपनीची विक्री सलग तिसऱ्या तिमाहीत घटली, कंपनीला का लागलं ग्रहण?

यामुळे आयफोन १५ च्या लाँच पूर्वी चर्चा रंगल्या आहेत.

193
Apple Sales Decline : ॲपल कंपनीची विक्री सलग तिसऱ्या तिमाहीत घटली, कंपनीला का लागलं ग्रहण?

ऋजुता लुकतुके

यावर्षी जून महिन्यात कंपनीचं (Apple Sales Decline) बाजारमूल्य 3.14 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकं होतं. सर्वाधिक बाजारमूल्याचा विक्रम या कंपनीच्या नावावर लागला. कारण, 3 ट्रिलियन मूल्य पार करणारी ही पहिली कंपनी होती. अशा या कंपनीचं नाव आहे ॲपल (Apple Inc). एकट्या 2023 मध्ये कंपनीचे समभाग 46 टक्क्यांनी वाढले. आणि त्यामुळेच कंपनीला हे मूल्य गाठता आलं.

पण, अलीकडे तीन महिन्यात कंपनीचं मुख्य उत्पादन असलेल्या आयफोनची (iPhone) मागणी जगभरात कमी झालेली दिसून आली आहे. आणि त्यामुळे जून ते ऑगस्ट महिन्यात कंपनीचे समभाग 4 टक्क्यांनी खाली आले आहेत. मागच्या सलग तिसऱ्या तिमाहीत ॲपल कंपनीच्या विक्रीत घट झालेली दिसून आली आहे.

जुलैमध्ये संपलेल्या तिमाहीच अॅपल कंपनीची विक्री दीड टक्क्यांनी कमी होऊन 81 अब्ज अमेरिकन डॉलरवर आली आहे. यात आयफोनची मागणी कमी झाली आहे. पण, ॲपल टीव्ही या कंपनीच्या व्हीडिओ सेवेला चांगला प्रतिसाद मिळालेला दिसून आला. त्यामुळे विक्रीची तफावतही कमी व्हायला मदत झाली.

विक्रीत झालेली घट वॉलस्ट्रीटने वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कमीच असली तरी कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी ल्युका मिस्त्री यांनी चालू तिमाहीतही विक्री कमीच राहील असं म्हटल्यानंतर त्याचा प्रतिकूल परिणाम समभागांवर झाला. नासडॅक तसंच न्यूय़ॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये कंपनीच्या समभागात दोन टक्क्यांची घट झाली.

(हेही वाचा – Mumbai Water Stock : मुंबईचा पाणी साठा ८० टक्के : आता कपात मागे घेण्याशिवाय महापालिकेकडे पर्याय नाही)

ॲपलची विक्री का घटली?

अँडॉईड फोनची वाढती स्पर्धा – ॲपल कंपनीचं मुख्य आणि सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन आहे आयफोन. कंपनीच्या विक्रीमध्ये आयफोनचाच वाटा सर्वाधिक असतो. पण, अलीकडे गुगल आणि अँडॉई़ड फोनची मोठी स्पर्धा कंपनीला सहन करावी लागत आहे. आणि लोकांचा ओढा तुलनेनं स्वस्त आणि ओपन प्लॅटफॉर्म असलेल्या अँड्रॉईडकडे वाढताना दिसतोय.

ॲॅपल कंपनीची इतर उत्पादनं अर्थात, आयपॅड, एअरपॉड आणि अॅपल वॉच यांची विक्री समाधानकारक असली तरी ती अपेक्षेपेक्षा कमीच आहे. याचा फटका कंपनीला बसला आहे.

व्हिजन प्रो रियालिटी हेडसेट रखडला – जून महिन्यात कंपनीने महत्त्वाकांक्षी व्हिजन प्रो रियालिटी हेडसेटची घोषणा केली. या हेडसेटमुळे थ्रीडी रिअल टाईम संवादात मोठी क्रांती अपेक्षित आहे. पण, हा हेडसेट अजून बाजारात आलेला नाही. ॲॅपलचे त्यावर पैसे मात्र खर्च होत आहेत. त्यामुळेही कंपनीचा खर्च वाढून विक्री कमी झाली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर होणारा खर्च – कंपनीने मायक्रोसॉफ्ट आणि गुगल प्रमाणेच आपला मोर्चा आता कृत्रिम बुद्धिमत्तेकडे वळवला आहे. कंपनीला यातले काही फिचर आपल्या आयफोनमध्येही आणायचे आहेत. पण, त्यालाही वेळ लागणार आहे.

जगभरात विक्रीचे आकडे खाली येत असताना चीन आणि भारतात मात्र कंपनीने समाधानकारक विक्री केली आहे. तर चीनमध्ये उलट कंपनीच्या विक्रीत 10 टक्के वाढ झाली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.