स्टॉलसाठी नक्षत्र मॉलमधील हलवली आग प्रतिबंधक यंत्रणा!

खाऊच्या स्टॉलला ही यंत्रणा अडथळा ठरत असल्याने मुंबई अग्निशमन दलाने ही यंत्रणा हलवून बाजुच्या भागावर लावली आहे. त्यामुळे आता याठिकाणी पुन्हा एकदा स्टॉल लावला जाणार आहे.

132

भांडुपमधील ड्रिम मॉलमधील आगीच्या घटनेने सनराइज रुग्णालयातील ११ जणांचा मृत्यू झालेला असतानाच दादरमधील नक्षत्र मॉलमधील आग प्रतिबंधक उपाययोजनांकरता असलेली यंत्रणा चक्क एका खाऊच्या स्टॉल्सकरता बाजुला हलवण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मॉलमधील आगप्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

New Project 3 16
या ठिकाणाहून आगप्रतिबंधक यंत्रणा हलवली.

मुंबई अग्निशमन दलानेच हलवली यंत्रणा!  

भांडुपमधील ड्रिम मॉलमधील आगीच्या दुघर्टनेनंतर मुंबईतील सर्व मॉल्समधील आग प्रतिबंधक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दादर पश्चिम येथील रानडे मार्गावरील नक्षत्र मॉलमध्ये मागील काही दिवसांपासून येथील आगप्रतिबंधात्मक उपाययोजनांची यंत्रणाच हलवली गेल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. या मॉलच्या प्रवेशद्वाराशेजारी आग प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. या यंत्रणाच्या ठिकाणीच खाऊचे एक स्टॉल आणि बाजुला तिकीट बुकींग सेंटर आहे. परंतु यामुळे खाऊच्या स्टॉलला ही यंत्रणा अडथळा ठरत असल्याने मुंबई अग्निशमन दलाने ही यंत्रणा हलवून बाजुच्या भागावर लावली आहे. त्यामुळे आता याठिकाणी पुन्हा एकदा स्टॉल लावला जाणार आहे.

New Project 2 17
या ठिकाणी आगप्रतिबंधक यंत्रणा बसवली.

महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडे तक्रार!  

मॉलच्या आराखड्यात ही यंत्रणा जिथे दाखवली आहे, तिथून आता दुसरीकडे केवळ स्टॉल लावता यावा म्हणून बसवण्यात येत आहे. त्यामुळे या मॉलमध्ये भविष्यात आगीची दुघर्टना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल गाळेधारकांकडूनच केला जात आहे. तसेच मॉलचा मुख्य प्रवेशद्वारही मोकळा राखला जात नसून बेडशिटचे दुकान चक्क बाहेरच्या पायऱ्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे या मॉलची पुन्हा आग प्रतिबंधक उपाययोजनेच्या माध्यमातून तपासणी करून ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे तसेच याठिकाणी जिथे जिथे अनधिकृत वापर केला जात आहे, त्याची तपासणी करून त्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे. या मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत फेरबदल केल्याचा आरोप अनिल गावकर यांनी केला आहे. यासंदर्भात आपण स्वत: महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडे तक्रार केली असून आपल्याला याबाबत समाधान उत्तर दिले जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा : भांडुपच्या आगीत सनराइज रुग्णालयतील नऊ जणांचा होरपळून मृत्यू!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.