Sexual assault : अभिनेत्रीवर उद्योजकाचा लैंगिक अत्याचार; आठवडा उलटला तरी आरोपीला अटक नाही

159
Sexual assault : अभिनेत्रीवर उद्योजकाचा लैंगिक अत्याचार; आठवडा उलटला तरी आरोपीला अटक नाही

चित्रपट, वेबसिरीज मध्ये काम करणाऱ्या ३५ वर्षीय अभिनेत्रीवर मागील चार महिन्यांपासून एका उद्योजकाकडून लैंगिग अत्याचार होत असल्याची तक्रार ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी ४१ वर्षीय उद्योजकावर लैगिंग अत्याचार, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला तरी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

पीडित अभिनेत्री ही लोअर परळ परिसरातील रहिवासी आहे. ती हिंदी चित्रपट, वेबसिरीजमध्ये भूमिका करते; तसेच टीव्ही शो मध्ये अँकरिंगचे काम करते. २८जुलै रोजी पीडित अभिनेत्रीने ना. म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, ऑक्टोबर २०२२ मध्ये मित्राच्या पार्टीत तीची ओळख ४१ वर्षीय उद्योजका सोबत झाली होती. पुढे दोघांची चांगली मैत्री झाली, मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन त्याने तीला लग्नाचे अमिष दाखवले आणि लोअर परळ येथे त्याच्या घरी राहण्यास बोलावले.

(हेही वाचा – पावसाळी अधिवेशनातही कळले नाही अजित पवार गटाचे नेमके संख्याबळ)

फेब्रुवारी २०२३ मध्ये ती त्याच्यासोबत त्याच्या घरी राहण्यास गेली. त्यानंतर उद्योजकाने मार्च महिन्यात मद्यधुंद अवस्थेत तिच्यावर बळजबरी करून लैंगिग अत्याचार केले. पुढे त्याने लग्नाचे अमिष दाखवत वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार बळजबरीने लैंगिग अत्याचार केला, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. गेल्या चार महिन्यांपासून वारंवार धमकी देऊन हा प्रकार सुरू असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.

पोलिसांनी या प्रकरणी उद्योजकाच्या विरुद्ध मारहाण करणे, धमकी देणे व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु, गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला तरी उद्योजकाला अटक करण्यात आलेली नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.