सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी खालापूर पोलिसांनी शुक्रवारी एडलवाईस कंपनीच्या अध्यक्षासह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास खालापूर पोलिसांनी सुरू केला असून, एडलवाईस ग्रुप आणि इसिएल फायनान्स कंपनीला नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच देसाई यांना देण्यात आलेल्या कर्जासंदर्भातील सर्व कागदपत्रे कंपनीकडून मागविण्यात आली आहेत.
नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. देसाई यांनी मृत्यूपूर्वी ११ ऑडिओ क्लिप तयार केल्या होत्या, त्यात त्यांनी त्यांचा मानसिक छळ कसा व कोणी केला, तसेच त्यांच्या आत्महत्येला जवाबदार असणाऱ्यांची नावे घेतली. शुक्रवारी खालापूर पोलिसांनी या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एडलवाईस कंपनीचे अध्यक्ष रिषेश शहा यांच्यासह कंपनीचे अधिकारी स्मित शहा आणि केयुर मेहता, आर के बन्सल आणि न्यायालयाने दोन्ही पक्षातील कर्जाची विषय सोडविण्यासाठी नियुक्त केलेले प्रशासक जितेंद्र कोठारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
(हेही वाचा – शरद पवारांच्या मनात काय?;’इंडिया’च्या मुंबईतील बैठकीचे यजमानपद दिले ठाकरे गटाला)
– देसाई यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या गुन्ह्याच्या तपासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी (पोलीस उपअधीक्षक) यांचे विशेष पथक गठीत करण्यात आले आहे.
– या पथकात १ पोलीस निरीक्षक ३ सहायक पोलिस निरीक्षक आणि ४ पोलीस अंमलदार असे ९ जणांचे पथक आहे. विशेष पथकाने शनिवारी एडलवाईस ग्रुप आणि इसिएल फायनान्स कंपनीला नोटीस बजावली असून, देसाई यांच्या कर्जासबंधी सर्व कागदपत्रे घेऊन मंगळवारी प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
– देसाई यांच्या एनडी स्टुडिओचे सल्लागार,आर्थिक सल्लागार,अकाउंट विभागाकडून कर्जासबंधी सर्व माहिती घेण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी १५ साक्षीदारांकडे चौकशी करून जबाब नोंदवले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community