भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर विणीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी येणाऱ्या मादी ऑलिव्ह रीडले कासवांचा एकमेकांशी संबंध येत असल्याचा महत्वाचा शोध लागला आहे. कांदळवन कक्ष आणि भारतीय वन्यजीव मंडळाकडून सॅटलाईट टॅग केलेल्या बागेश्री या मादी ऑलिव्ह रीडले कासवाने पाच महिन्यात राज्याच्या किनारपट्टीवरून थेट बंगालच्या उपसागरातील समुद्रात मजल मारली.
श्रीलंकेच्या पूर्व किनारपट्टीवरील समुद्रात ओडिशा समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालणारी ऑलिव्ह रीडले कासवही येतात. या दोन्ही दिशांवरील ऑलिव्ह रीडले कासवांचा समुद्रकिनाऱ्यावर अंडी घातल्यानंतर थेट बंगालच्या उपसागरात संबंध येत असल्याचे दिसून आले.
यंदाच्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात दक्षिण कोकण किनारपट्टीवरून दोन मादी ऑलिव्ह रीडले कासवांना शास्त्रज्ञांनी सॅटलाईट टॅग केले. एकीला गुहा तर दुसऱ्या मादी ऑलिव्ह रीडले कासवाला बागेश्री नाव दिले गेले. त्यापैकी बागेश्री सुरुवातीपासूनच दक्षिणेकडील राज्यातील समुद्रात फिरत होती. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला बागेश्री श्रीलंकेच्या समुद्रात दिसून आली. त्यानंतर थेट तिने तीन दिवसांतच बंगालच्या उपसागरातील समुद्रात प्रवेश केला. सध्या बागेश्री श्रीलंकेच्या पूर्वेला बाटीकालोआ समुद्रकिनाऱ्यापासून 400 किलोमीटर दूर समुद्रात वास्तव्य केल्याची माहिती शास्त्रज्ञानी दिली.
(हेही वाचा Earthquake : चीन भूकंपाने हादरला; १२६ इमारती कोसळल्या)
Join Our WhatsApp Community