Mahad : धक्कादायक! महाड येथील गावात जमिनीतून येतात सुरुंग फुटल्याचे आवाज; गावकरी भयभीत

166
महाडच्या कसबे शिवथर गावात जमिनीतून मोठमोठे सुरुंग फुटल्याचे आवाज येत आहेत. भूगर्भातून आवाज येत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या आवाजांचे गूढ शोधण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी, एनडीआरएफ टीमने गावाला भेट दिली आहे. त्याचबरोबर ग्रामस्थांना धीर देण्याचा प्रयत्न केला असून सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आला आहे.
महाड तालुक्यातील कसबे शिवथर गावच्या परिसरात मागील काही दिवसांपासून भूगर्भातून मोठ मोठे आवाज येत होते.  दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या या गावात ७० ते ८० घरे आहेत. ४ ऑगस्ट रोजी दिवसभर अधूनमधून आवाज येत होते. तर, त्याच रात्री मोठा जमिनीतून मोठा आवाज झाला. भूगर्भातून आलेल्या आवाजामुळं नागरिक घाबरले होते. त्यानंतर त्यांनी तातडीने प्रशासनाला याबाबत माहिती दिली. महाडचे प्रांताधिकारी ज्ञानेश्वर बाणापुरे यांनी महसूल कर्मचारी, पोलीस यंत्रणा तसेच एनडीआरएफच्या टीम सह गावाला भेट दिली. प्रशासनाच्या पथकाने दिवसभर पाहणी केली. मात्र त्यांना यामागची कारणे अद्याप समजू शकली नाहीत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.