chandrayaan 3 ची अंतिम लक्ष्याकडे कूच

155

भारताच्या महत्त्वाकांक्षी chandrayaan 3 यानाने अंतिम लक्ष्याकडे कूच केले आहे. शनिवार, 5 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 7:15 वाजता, प्रक्षेपणानंतर 22 दिवसांनी, चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. चांद्रयान-3चे 14 जुलै 2023 रोजी पृथ्वीवरून प्रक्षेपित करण्यात आले.

chandrayaan 3 हे 1 ऑगस्ट 2023 च्या रात्री सुमारे 12 वाजता पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले. यापूर्वी ते अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते, ज्याचे पृथ्वीपासून किमान अंतर 236 किलोमीटर आणि कमाल अंतर 1 लाख 27 हजार 603 किलोमीटर होते. chandrayaan 3 हे 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार आहे. त्याला चंद्राच्या कक्षेत पाठवण्यासाठी वाहनाचा वेग कमी करण्यात आला, जेणेकरून ते चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेऊ शकेल. वेग कमी करण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी वाहनाचा थ्रस्टर २०-२५ मिनिटांसाठी उडवला. चंद्रावर उतरण्यापूर्वी चांद्रयान 4 वेळा आपली कक्षा बदलेल. इस्रोने याबाबत माहिती दिली. इस्रोने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “MOX, ISTRAC, हे चांद्रयान-3 आहे. चंद्राचे गुरुत्वाकर्षण जाणवते. चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या ठेवण्यात आले आहे. आता 6 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 11 वाजता चांद्रयानाची कक्षा कमी होणार आहे.

(हेही वाचा Mahad : धक्कादायक! महाड येथील गावात जमिनीतून येतात सुरुंग फुटल्याचे आवाज; गावकरी भयभीत

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.