मृत भारत स्थानके पुनर्विकास योजनेचा रविवार, ६ ऑगस्ट रोजी देशव्यापी शुभारंभ झाला. याचाच भाग म्हणून, मुंबईत परळ स्थानकात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात रेल्वेचे योगदान अधोरेखित केले. अमृत भारत स्थानके पुनर्विकास ह्या उपक्रमाअंतर्गत, महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करुन, ती अत्याधुनिक केली जाणार असून, त्यात प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा देण्यावर भर दिला जाणार आहे.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना, राज्यपाल बैस यांनी राज्यातील पायाभूत सुविधा उभारणीला बळ देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कटिबद्धतेबद्दल, कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आभासी पद्धतीने, देशातल्या 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव देखील उपस्थित होते.
रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्याचे महत्त्व अधोरेखित करतांना, ते म्हणाले की हे दीर्घ काळापासून प्रलंबित होते. आता आधुनिक सुविधायुक्त स्थानके, ग्रामीण विकासाला गती देतील, आणि मुंबई सारख्या शहरासाठी देखील, प्रवास सुखकर होण्यात मदत होईल, असे ते म्हणाले. त्याशिवाय, रेल्वेशी संबंधित, ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई मेट्रो प्रकल्प आणि किनारी मार्ग प्रकल्प अशा सर्व पायाभूत प्रकल्पांमुळे मुंबईचा कायापालट होणार असून, हे एक जागतिक दर्जाचे शहर बनेल, असेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचा Mahad : धक्कादायक! महाड येथील गावात जमिनीतून येतात सुरुंग फुटल्याचे आवाज; गावकरी भयभीत)
‘अमृत भारत स्थानक योजने’त समाविष्ट महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके:
- मुंबई रेल्वे विभाग – कांजुरमार्ग, परळ, विक्रोळी.
- सोलापूर रेल्वे विभाग – अहमदनगर, दौंड, कोपरगाव, कुर्डुवाडी जंक्शन, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, सोलापूर
- पुणे रेल्वे विभाग – आकुर्डी, कोल्हापूर, तळेगाव
- भुसावळ रेल्वे विभाग – बडनेरा, मलकापूर, चाळीसगाव, मनमाड, शेगाव
- नागपूर रेल्वे विभाग – वडसा, गोंदिया, चांदाफोर्ट, बल्लारशाह, चंद्रपूर, धामणगाव, गोधनी, हिंगणघाट, काटोल, सेवाग्राम, नरखेड, पुलगाव.
- नांदेड रेल्वे विभाग – औरंगाबाद, गंगाखेड, हिंगोली डेकन, जालना, किनवट, मुदखेड, नगरसोल, परभणी, परतूर, पूर्णा, सेलू, वाशिम.
- सिकंदराबाद रेल्वे विभाग – परळी वैजनाथ.