Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये भीषण रेल्वे अपघात, 20 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

156

पाकिस्तानातील (Pakistan) कराचीपासून 275 किलोमीटर अंतरावर असलेल्या स्थानकाजवळ रावळपिंडीला जाणाऱ्या हजारा एक्सप्रेसचे (Hajara Express) दहा डबे रुळावरुन घसरले. या अपघाताची (Accident) तीव्रता इतकी भीषण होती की आतापर्यंत या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर जवळपास 80 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात हा अपघात झाला आहे. दरम्यान यामध्ये जखमी झालेल्या लोकांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट

या अपघाताची तीव्रता जास्त जरी असली तरी या अपघातामगाचं नेमंक कारण अद्याप अस्पष्टच आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री  ख्वाजा साद रफीक यांनी हा अपघात कोणीतरी मुद्दाम घडवून आणल्याचा दावा पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. तसेच त्यांनी तांत्रिक बिघाडामुळेही हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु याचे ठोस कारण अजूनही प्रशासनाकडून देण्यात आले आहे. पाकिस्तानचे लष्करी पथक देखील बचावकार्यात सहभागी झाले आहे. या मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प असून रुळावरुन डबे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ज्या रेल्वेचा अपघात झाला ती रेल्वे वर्षाच्या सुरुवातीलाच एका मोठ्या अपघातातून बचावली होती अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्थेने दिली आहे. सध्या 100 पेक्षा अधिक पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले आहे. तर नागरिकांना खाण्यापिण्याची सोय देखील करण्यात येत आहे. दरम्यान सिंध प्रांतातील प्रत्येक रुग्णालयात आणीबाणी देखील घोषित करण्यात आली आहे.

(हेही वाचा Terrorist : पुण्यात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण शिबीर; ‘आयसिस’चा अड्डा उद्ध्वस्त)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.