म्हाडाने मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची नवीन तारीख अद्याप जाहीर केली नसल्याने, सोडतीसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अर्जदारांकडून म्हाडाला एकूण ५१९ कोटी रुपयांची अनामत रक्कम मिळाली आहे. म्हाडाने यापूर्वी १८ जुलै रोजी सोडत काढली जाणार असल्याची घोषणा केली होती, मात्र आता म्हाडाकडून अर्जाची अंतिम मुदत वाढवून सोडत पुढे ढकलली गेली आहे. अजूनही म्हाडाने नवीन सोडतीची तारीख जाहीर केली नसल्याने अर्जदार मात्र नवीन तारखेच्या प्रतीक्षेत आहेत.
म्हाडा मुंबई मंडळाच्या ४०८२ सदनिकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १० जुलैला संपली. म्हाडाने याआधी १८ जुलै रोजी सोडत जाहीर करणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे अर्ज केलेले एका लाखाहून अधिक अर्जदार सोडतीची नवीन तारीख कधी जाहीर होणार याची आतूरतेने वाट पाहत आहेत. झालेल्या विलंबामुळे अर्जदार आपली संतप्त प्रतिक्रिया समाज माध्यमांवर मांडत आहेत.
(हेही वाचा – Gadchiroli Accident : सुरजागड लोहखनिज प्रकल्प; उत्खनन करणारे वाहन कोसळून अभियंत्यासह तिघांचा मृत्यू)
गिरणी कामगारांसाठीच्या ‘इतक्या’ घरांची सोडत लवकरच निघणार
गिरणी कामगारांसाठीच्या रखडलेल्या २५२१ सदनिकांच्या सोडतीचा मुहूर्त लवकरच निघणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई मंडळाने दीड लाख अर्जदारांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली असून, या यादीतील गिरणी कामगारांचाही या सोडतीत सहभाग असेल. रांजनोळीतील १ हजार २४४ घरांची दूरवस्था झाली असून या घरांची दुरुस्ती नेमकी कोण करणार? यावरून वाद सुरू आहे. तरीही, म्हाडाने रांजनोळीसह उपलब्ध २५२१ घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community