केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसांचा पुणे दौरा केला. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान अनेक घडामोडी घडल्या. मात्र एका घटनेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रविवार, ६ ऑगस्ट रोजी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी अमित शहा यांची गुप्त भेट घेतली अशी बातमी सर्वत्र झळकू लागली. त्यामुळे राजकीय वर्तुळातून पुन्हा चर्चेला तोंडं फुटलं. महायुतीत सामील होण्यासाठी जयंत पाटलांना भाजपाकडून ऑफर देण्यात आल्याचंही बोललं जात आहे. मात्र स्वतः जयंत पाटील यांनी हा बातमीचं खंडन केले आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
“अमित शाह यांची मी भेट घेतली नाही. आज सकाळीच मी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे प्रसारमाध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये कसलंही तथ्य नाही. अशा अफवांमुळे लोकांमध्ये माझ्याबद्दल गैरसमज पसरत आहे.”
(हेही वाचा – Gyanvapi Survey : तीनही घुमट आणि परिसराचे सर्वेक्षण सुरु; भिंतींचे 3-डी छायाचित्रण)
अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील आणि अमित शाह यांच्यातील कथित भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला असं वाटतं की, काही लोकांना अफवा पसरवायला फार आवडतं. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी किमान खात्री करून बातम्या दिल्या पाहिजेत. जयंत पाटील आणि अमित शाह यांच्यात कुठलीही भेट झाली नाही. जे पतंगबाजी करतायत, त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी आपला काहीतरी स्तर राखावा. तसेच अशा घटनेची पुष्टी केल्यानंतरच अशा प्रकारच्या बातम्या द्याव्या.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community