Rahul Gandhi : राहुल गांधी पुन्हा खासदार; लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी

165
Rahul Gandhi : राहुल गांधी पुन्हा खासदार; लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी

नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. याबाबत लोकसभा सचिवालयाने आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून खासदारकी बहाल करण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता राहुल गांधींना उर्वरीत अधिवेशनात सहभागी होता येणार आहे.

मोदी आडनाव बदनामी प्रकरणात वायनाडचे काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना २ वर्षांची शिक्षा झाली आणि खासदारकी गमवावी लागली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर त्यांची संसदेतील सदस्यत्व बहाल करण्यासाठीचे कागदपत्र लोकसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑगस्ट रोजी राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देताना राहुल गांधी यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याचे कोणतंही कारण ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांनी दिले नव्हते. अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

(हेही वाचा – Organ Donation : ‘या’ ठिकाणी २५ वर्षांच्या मुलाकडून अवयवदान)

उद्या म्हणजेच ८ ऑगस्ट..म्हणजे उद्या संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. २०१४ नंतर मोदी सरकारच्या विरोधातला हा दुसरा अविश्वास प्रस्ताव आहे. खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) या चर्चेत राहुल गांधी सहभागी होणार आहे.

मोदी सरकारच्या विरोधात मागचा अविश्वास प्रस्ताव आला होता. त्यावेळी भाषणानंतर राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मारलेली मिठी चांगलीच गाजली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.