Rain Fall : मुंबईसह कोकण वगळता या आठवड्यात पाऊस कमीच

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार सरींनी राज्यभरातून ब्रेक घेतला

175
Rain Fall : मुंबईसह कोकण वगळता या आठवड्यात पाऊस कमीच
Rain Fall : मुंबईसह कोकण वगळता या आठवड्यात पाऊस कमीच

गेल्या आठवड्यापासून राज्यातील बहुतांश भागात पावसाची संततधार बंद झाली आहे. सध्याच्या ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम पावसाच्या वातावरणानंतर आठवडाभर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. येत्या रविवारपर्यंत ही स्थिती राहील, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार सरींनी राज्यभरातून ब्रेक घेतला. त्याअगोदर जुलै महिन्यातील पावसामुळे राज्यभरात पूरजन्य परिस्थिती उद्भवली होती. गेले ४० दिवस जोरदारपणे कोसळलेल्या पावसामुळे सह्याद्रीच्या घाटमाथा धरण जलसंचय क्षेत्रात धरणे ७० टक्के भरली आहेत. परंतु तेथे आता पावसाचे प्रमाण काहीसे कमी होण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणात अति जोरदारपणे कोसळलेल्या पावसाची तीव्रताही येत्या ह्या आठवड्यात काहीशी कमी होण्याची शक्यता जाणवते, असाही अंदाज खुळे यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – ICC World Cup 2023 : अखेर पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकात खेळणार)

पिकांवर परिणाम

खरीप पिकांना चांगल्या पावसाअभावी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ओढ बसण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. येणाऱ्या रब्बी हंगामाच्या नियोजनासाठीही विचारपूर्वक करा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.