Mulund : मुलुंड परिसरात लंगूरला विजेचा धक्का

ठाणे आणि मुलुंड स्थानक परिसरानजिकच्या मानवी वस्तीत माकड आणि लंगूरचा वावर वाढला आहे

454
Mulund : मुलुंड परिसरात लंगूरला विजेचा धक्का
Mulund : मुलुंड परिसरात लंगूरला विजेचा धक्का

ठाणे आणि मुलुंड स्थानक परिसरानजिकच्या मानवी वस्तीत माकड आणि लंगूरचा वावर वाढला आहे. माकड आणि वानर रेल्वे स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला ये-जा करण्यासाठी मोठ्या संख्येने विजेच्या तारांचा वापर करतात. गेल्या दोन तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात माकड विजेचा धक्का लागून जखमी होण्याचे प्रमाण वाढलेले असताना आता लंगूरही जखमी होऊ लागले आहेत. या भागात मानव-माकड संघर्ष सुरु होत असल्याचे प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांनी सांगितले.

रविवारची घटना

रविवारी मुलुंड नाहूर परिसरातून रात्री नऊच्या सुमारास वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी (डबल्यूडबल्यूए) या प्राणीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी जखमी अवस्थेतील लंगूरला पकडले. गेल्या चार दिवसांपासून मुलुंड पश्चिमेतील नाहूर गावात जखमी अवस्थेतील लंगूर फिरत होते. त्याला पाहताच स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्थानिक प्राणीप्रेमी गणेश कडीपूर आणि रोमील नाथवानी यांनी लंगूरला पकडायला डबल्यूडबल्यूए या प्राणीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडे मदत मागितली. अखेरीस रविवारी रात्री नऊ वाजता लंगूर पकडला गेला. विजेच्या धक्क्याने त्याची एक बाजू पूर्णपणे निखळल्याची भीती नाथवानी यांनी व्यक्त केली.

(हेही वाचा – बंगाली बाबाची जडीबुटी जेवणात मिसळून पतीच्या हत्येचा कट, पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल)

संघर्ष टाळा

या परिसरात माकडांचा वावर वाढत आहे. नजीकच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून माकड गेल्या काही वर्षांपासून मानवी वस्तीकडे सरकू लागले आहेत. माकड जवळ येण्यासाठी स्थानिक माणसे त्यांना फळे आणि घरातले अन्नपदार्थ खाऊ घालत आहेत. वन्यजीवांना नैसर्गिक पद्धतीने जंगलात उपलब्ध अन्नपदार्थ मिळायला हवेत. माणसांनी माकडांना आयते अन्नपदार्थ खाण्याची सवय लावू नये. यातून माणसांना माकडाकडून मार बसणे, चावा घेणे या घटना घडू शकतात.
रोमील नाथवानी, प्राणीप्रेमी, मुलुंड

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.