जुलै महिन्यात जवळ जवळ संपूर्ण राज्यात पावसाने विक्रमी हजेरी लावली. मात्र असं असूनदेखील अनेक ठिकाणी पाणी कपात करण्यात आली आहे. अशातच नवी मुंबई महापालिकेमार्फत मंगळवारी 8 ऑगस्ट रोजी मुख्य जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी सदर जलवाहिनीवरील पाणी पुरवठा 8 ऑगस्ट रोजी बंद राहणार आहे.
त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात 08 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नाही. तसेच या कालावधीत महापालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे नोड मधील पाणीपुरवठा देखील बंद राहील.
त्याचप्रमाणे बुधवार 9 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. तरी या कालावधीत पाण्याचा वापर जपून करुन नवी मुंबई महापालिकेस सहकार्य करावे, असे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community