ज्ञानपीठ पुरस्कार विजेते नेमाडे यांची वैचारिकता भ्रष्ट आहे. केवळ व्यक्तिगत जातीद्वेष आणि हिंदू विरोधी विचारांमुळे नेमाडे अतिशय खालच्या पातळीचे आहेत, हे दिसून आले आहे. याशिवाय दुसरे शब्द नेमाडे यांच्यासाठी नाही. नेमाडे यांनी जी मुक्ताफळे उधळली आहेत. यावरून नेमाडे यांची लायकी राहिली नाही. नेमाडेंच्या या अशा वक्तव्यांनी खरे तर ज्ञानपीठ पुरस्काराचा अपमान झाला आहे. त्यामुळे सरसकट अशा महत्वाच्या पुरस्काराची खिरापत वाटण्यापेक्षा हा पुरस्कार देण्यासाठी चाळणी लावण्याची आवश्यकता आहे, असे कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलले.
इतिहासाचा विपर्यास करून नेरेटिव्ह सेट केला जातोय
कोळसे-पाटील आणि बिग्रेडीदेखील अशा प्रकारची मुक्ताफळे उधळत असतात, त्यांना जाब विचारला जात नाही म्हणून त्यांचे फावते आहे. नेमाडेंसारखी माणसे इतिहासाचा विपर्यास करून नेरेटिव्ह सेट करत असतात, जे वर्षानुवर्षे सुरु असून यातून हिंदू धर्माची, हिंदूंची बदनामी केली जात असते. काशी विश्वेश्वराविषयीदेखील असेच नेरेटिव्ह सेट करण्यात आले आहे. ज्यामध्ये भगवान शंकर आणि नंदी यांच्यात भांडण झाले, त्यामुळे नंदी रागावून शंकराकडे पाठ करून बसला असे म्हटले जात आहे, पण तेथील मशिदीच्या खाली भगवान शंकराची मूर्ती आहे आणि नंदी त्याचा पुरावा आहे, हे का सांगत नाही?, असेही कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे म्हणाले.
(हेही वाचा Gyanvapi Survey : तीनही घुमट आणि परिसराचे सर्वेक्षण सुरु; भिंतींचे 3-डी छायाचित्रण)
नेमाडेंवर कायदेशीर कारवाई करा – कुणालदादा मालुसरे
नेमाडे हे जात्यंध आहेत. नेमाडेंनी स्त्री सती का जायच्या, हे आधी समजून घेतले पाहिजे. मुसलमान आक्रमणकर्ते त्यांच्या पतीचे निधन झाल्यावर त्यांना मुसलमान आक्रमणकर्ते त्यांच्या जनानखान्यात घेऊन जायचे, त्यांच्यावर अत्याचार करायचे. आपल्या पतीनंतर आपले संरक्षण कुणी करणार नाही, या विचारामुळे हिंदू स्त्रिया त्यावेळी सती जायच्या. औरंगजेब हा हिंदू स्त्रियांचा उपभोग घ्यायचा. जर नेमाडेंच्या म्हणण्यानुसार औरंगजेबाच्या दोन बेगम हिंदू मंदिरात जायच्या, असे असते तर औरंगजेबाने सगळ्यात आधी त्यांच्या माना कापल्या असत्या. खरेतर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपला देश सुरक्षित राहायला आहे. महाराजांनी तेव्हा धर्मांतरित मुसलमानांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश दिला होता. अन्यथा आज जगात भारत ५८वा मुसलमान देश बनला असता. समाजात जातीद्वेष पसरवणाऱ्या नेमाडेंवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणालदादा मालुसरे म्हणाले.
नेमाडेंचे साहित्य विद्वेषी – रमेश शिंदे
भालचंद्र नेमाडे हे कायम हिंदू विरोधात बोलत असतात, औरंगजेबाच्या दोन बायका हिंदूंकडे जात होत्या, हे औरंगजेबाच्या बायकांनी नेमाडेंना येऊन सांगितले होते का कि त्यांच्याकडे तसे पुरावे आहेत. पुराव्याशिवाय बोलण्याची नेमाडे यांची वृत्ती आहे. एका ज्येष्ठ साहित्यिकाने अशा पद्धतीने विनापुरावा बोलू नये. साहित्याचा मुख्य भाग म्हणजे साहित्य निष्पक्ष असले पाहिजे. पण नेमाडे यांचे साहित्य हे विद्वेषी वृत्तीचे आहे. त्यामुळे नेमाडे यांचे वक्तव्य पाहता त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे म्हणाले.
Join Our WhatsApp Community