Chine : मोदींविरोधी मोहिमेसाठी चीनकडून अर्थपुरवठा – न्यूयॉर्क टाइम्सची धक्कादायक माहिती 

190

देशात विशिष्ट अजेंडा डोक्यात ठेवून हेट मोदी कॅम्पेन चालवणारे NewsClick वेब पोर्टल आणि त्याचा मालक नेव्हिल रॉय सिंघम हे चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या हातातले बाहुले आहे. 2018 ते 2021 दरम्यान चिनी कम्युनिस्ट पार्टीने NewsClick ला 38 कोटी रुपये दिले, त्यापैकी 9.59 कोटी रुपये मनी लॉन्ड्रीगद्वारे आले. न्यूज क्लिक कंपनीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आयटी सेलच्या मेंबरला 52 लाख रुपये दिले. या सगळ्या फंडिंगमध्ये नेव्हिल रॉय सिंघम हा पॉईंट मॅन होता. त्याची चिनी कम्युनिस्ट पक्षाशी हातमिळवणी आहे, अशी धक्कादायक माहिती न्यूयॉर्क टाइम्सने दिली.

चीनच्या या धोरणाचा धोका केवळ भारतालाच नाही, तर तो अमेरिकेसारख्या लोकशाहीला देखील आहे.  याचा स्पष्ट खुलासा ईडीच्या चौकशी आणि तपासात झालाच होता. ती केस आजही सुरू आहे. आता फक्त त्याची कबुली न्यूयॉर्क टाइम्सने दिली आहे, जी आत्तापर्यंत न्यूयॉर्क टाइम्स कधी देत नव्हता.

(हेही वाचा Bhalchandra Nemade : हिंदूद्वेषी नेमाडेंनी ज्ञानपीठ पुरस्काराचा अपमान केला – कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे)

अनुराग ठाकूर @ianuragthakur अगदी ‘न्यूयॉर्क टाईम्स’ सारखी वर्तमानपत्रेही आता हे मान्य करत आहेत, की नेव्हिल रॉय सिंघम आणि त्यांचे न्यूजक्लिक हे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे (CPC) धोकादायक साधन आहे आणि जगभरात चीनच्या राजकीय अजेंडाचा प्रचार करत आहेत.

पण NYT च्या खूप आधी, भारत संपूर्ण जगाला हेच ओरडून सांगतोय की, NewsClick हे चिनी प्रचाराचे धोकादायक जागतिक वेब माध्यम आहे. समविचारी शक्तींच्या पाठिंब्याने, नेव्हिल हा संशयास्पद भारतविरोधी अजेंडा पुढे नेत आहे. 2021 मध्ये, जेव्हा भारताच्या कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींनी मनी लाँड्रिंगच्या भक्कम पुराव्याच्या आधारे NewsClick विरुद्ध चौकशी सुरू केली, तेव्हा काँग्रेस आणि डावी लिबरल यांची सगळी इकोसिस्टम त्याचा बचाव करण्यासाठी पुढे आली होती.

काँग्रेसने नेव्हिल आणि न्यूजक्लिकचा बचाव करणे स्वाभाविक आहे कारण त्यांच्या नेतृत्वासाठी राष्ट्रीय हित कधीच महत्त्वाचे नसते. याच काँग्रेस पक्षाने 2008 साली भारतातील चिनी हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी CPC सोबत सामंजस्य करार केला आणि चिनी दूतावासाकडून राजीव गांधी फाउंडेशन (RGF) साठी कथितपणे देणग्या स्वीकारल्या आहेत ना!!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.