आरोग्य सेवा संचालनालयानुसार, २०२०-२१ पासून, जळगाव, वर्धा, सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, ठाणे आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगासंबंधी कुठल्याही नवीन प्रकरणांची नोंद झाली नाही. हे ८ जिले हत्तीरोग पूर्णपणे नष्ट करण्याच्या शेवटच्या टप्प्यावर आले आहेत आणि म्हणून लवकरच त्यांना जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) प्रमाणपत्र प्राप्त होईल.
हत्तीरोग हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. यामध्ये रुग्णांचे पाय आणि वृषण हे आकाराने जाड होतात व रुग्णास हालचाल करणेही अवघड होते. हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा रोग असून सामान्यतः तो लहानपणात होतो. हत्तीरोग हा मायक्रोफिलेरिई नावाच्या अळ्यांमुळे होतो. या अळ्या डासांच्या चावल्यामुळे पसरतात. निरोगी व्यक्तीस डास चावल्यामुळे संक्रमण होते. हा रोग झाल्यानंतर त्यावर कोणताही परिणामकारक उपाय नाही. हत्तीरोग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधांचे सेवन करणे आवश्यक आहे.
“प्राणघातक नसले तरी, नंतरचे परिणाम भयंकर आहेत, कारण विकृती व्यक्तींना गरिबी आणि अलिप्ततेत अडकवते, ज्यामुळे गंभीर सामाजिक आणि आर्थिक नुकसान होते, असे पालघर जिल्ह्याचे हिवताप अधिकारी डॉ. सागर पाटील म्हणाले. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनेंतर्गत, रोगाने प्रभावित प्रदेशातील रुग्णांना डायथिलकार्बामाझिन (DEC) आणि अल्बेंडाझोल या औषधांचे मिश्रण दिले जाते.
Join Our WhatsApp Community