नवी मुंबई येथील नेरुळमधील कोर्टयार्ड बायमेरियेट येथे डॉक्टरांसाठी आयोजित कार्यक्रमात हृदयविकाराच्या झटक्याने डॉक्टराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. डॉ. अभय उप्पे असे मृत डॉक्टराचे नाव असून ते डी. वाय. पाटील रुग्णालयात छाती आणि श्वसनरोग विभागाचे प्रमुख होते. या कार्यक्रमात ५० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असताना त्यांचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
कोर्टयार्ड बायमेरियेट येथील कार्यक्रमात डॉ. उप्पे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यानच्या काळात त्यांना अस्वस्थ वाटू लागले. परिणामी त्यांनी कार्यक्रम अर्धवट सोडून घरी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र हॉटेलच्या लिफ्टजवळच त्यांना छातीत दुखू लागले. डॉ. उप्पे जागीच कोसळले. डॉ. उप्पे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात येताच तातडीने उपस्थित डॉक्टरांनी त्यांना सीपीआर दिला. डॉक्टरांनी तातडीने खासगी कार्डीएक रुग्णवाहिका बोलावली. नजीकच्या खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉ. उप्पे यांना मृत घोषित करण्यात आले.
(हेही वाचा – Aditi Swami : तिरंदाजीतील भारताच्या ‘या’ उगवत्या ताऱ्याविषयी ५ महत्त्वाच्या गोष्टी)
डॉ. उप्पे यांच्या पत्नी, दोन मुले आणि आई घरी पोहोचल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली गेली. दीड महिन्यांपूर्वीच डॉ. उप्पे यांची सीटी एंजियोग्राफी करण्यात आली होती. त्यावेळी डॉ. उप्पे यांचा वैद्यकीय अहवाल नॉर्मल आला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community