IPL : सनरायजर्स संघाने मुख्य प्रशिक्षक ब्रायन लारांना दिला डच्चू; डॅनिएल व्हिटोरींची वर्णी

आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्राबादचा संघ एकदाच विजेतेपद पटकावू शकलाय. बाकी त्यांना उपान्त्य फेरीत प्रवेश करणंही शक्य झालेलं नाही. म्हणूनच असेल कदाचित मागच्या सहा हंगामात संघाने तब्बल चारदा आपला मुख्य प्रशिक्षक बदललाय.

175

आयपीएलमध्ये सुरुवातीपासून असलेला एक संघ सनरायजर्स हैद्राबादने मुख्य प्रशिक्षक पदावर न्यूझीलंड संघाचे माजी फिरकी गोलंदाज डॅनिेल व्हिटोरी यांनी नियुक्ती केली आहे. या हंगामातील खराब कामगिरीनंतर त्यांनी ब्रायन लाराची या पदावरून हकालपट्टी केली आहे.

व्हेटोरी यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचं प्रशिक्षक पद सांभाळलेलं आहे. तसंच आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही ते प्रशिक्षक होते.

सनरायजर्स संघाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या बदलाची घोषणा केली आहे. ब्रायन लारा सनरायजर्स संघाशी आधी फलंदाजीचे प्रशिक्षक आणि मग मुख्य प्रशिक्षक अशा भूमिकेतून मागची दोन वर्षं जोडलेले होते. पण, या कालावधीत सनरायजर्स संघावर तळाशी राहण्याची नामुष्की दोनदा ओढवली.

(हेही वाचा Bhalchandra Nemade : हिंदूद्वेषी नेमाडेंनी ज्ञानपीठ पुरस्काराचा अपमान केला – कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे)

ताज्या हंगामातही 14 पैकी फक्त 4 सामने संघाला जिंकता आले. त्यामुळे संघ प्रशासनाने हा निर्णय घेतलेला दिसतोय. ही घोषणाही सनरायजर्स संघाने ट्विटरवरच केली होती.

ट्विटरवरील आपल्या संदेशात संघ प्रशासनाने म्हटलंय की, ‘ब्रायन लारा यांच्याबरोबरचा दोन वर्षांचा कार्यकाळ आज संपत आहे. सनरायजर्ससाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी लारा यांना शुभेच्छा!’

मागच्या सहा हंगामात सनरायजर्स संघाचे व्हिटोरी हे चौथे मुख्य प्रशिक्षक आहेत. नवीन हंगामात ते कामाची सूत्र हाती घेतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.