Dam : तलावांमधील पाणीसाठा समाधानकारक; आता प्रतीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत १०० टक्के जमा होण्याची

248

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता हळूहळू वाढ होत असून यासर्व धरणांमध्ये पाण्याच्या साठा तब्बल ८१ टक्के एवढा जमा झाला आहे. त्यामुळे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीलाच पाणी साठा ८१ टक्क्यांच्यावर पोहोचल्याने उर्वरीत १ ऑक्टोबर पर्यंत २० टक्क्यांपर्यंतचा साठा जमा होऊ दे असे जलअभियंता विभागाला वाटत आहे. त्यामुळे सध्या तरी जमा झालेला एकूण पाणीसाठा हा महापालिकेला समाधानकारक वाटत असून सध्या तरी सर्व तलाव ओसंडून वाहायला हवी असा विचार जलअभियंता विभागाचा नाही. त्यामुळे १ ऑक्टोबरपर्यंत यासर्व तलावांमधील पाणीसाठा १०० टक्के एवढाच राहिला जावा असे जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्यवैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ३८५० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी यासर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. मागील आठवड्यात २९ जुलै २०२३ रोजी यासर्व तलावांमध्ये १०लाख ३९ हजार ८२५ दशलक्ष लिटर्स अर्थात ७१ टक्के एवढा पाणीसाठा जमा झाला होता. तर ५ ऑगस्ट २०२३ रोजी ११ लाख ५७ हजार ९१९ दशलक्ष लिटर्स अर्थात ८० टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. तर ७ ऑगस्ट रोजी हा पाणीसाठा ११ लाख ७२ हजार ९६७ लिटर अर्थात ८१.०४ टक्के एवढा होता. त्यामुळे आतापर्यंत ३०४ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला असला तरी जलअभियंता विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या जरी हा पाणीसाठा जमा झालेला दिसत असला तरी प्रत्यक्षात १ ऑक्टोबर रोजी जो पाणीसाठा असेल त्यावर मुंबईकरांच्या पुढील पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे सध्या जर हे तलाव तुडुंब भरले तरी यातील सर्व पाणी ओसंडून वाहून जाणार आहे. त्याऐवजी पुढील कालावधीत जरी पाणी पातळीत वाढ होऊन ३० सप्टेंबर पर्यंत हा पाणीसाठा १०० टक्के राहिल्यास मुंबईकरांना पुढील जुलै ते ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणी पुरवठा करून शकतो,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा Bhalchandra Nemade : हिंदूद्वेषी नेमाडेंनी ज्ञानपीठ पुरस्काराचा अपमान केला – कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे)

७ ऑगस्ट पर्यंतचा पाणीसाठा

  • २०२३ : ११ लाख ७२ हजार ९६७ दशलक्ष लिटर्स (८१.००४टक्के)
  • २०२२: १३ लाख १९ हजार ५२४ दशलक्ष लिटर्स (९१.१७ टक्के)
  • २०२१: ११ लाख ६१ हजार १२९ दशलक्ष लिटर्स ( ८०.२२ टक्के )
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.