एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघात अनेक नवे चेहरे; भारतीय वंशाच्या तन्वीर संगालाही संधी

तन्वीर सिडनी थंडर्स संघाकडून स्थानिक टी-२० लीग खेळतो

230
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघात अनेक नवे चेहरे; भारतीय वंशाच्या तन्वीर संगालाही संधी
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघात अनेक नवे चेहरे; भारतीय वंशाच्या तन्वीर संगालाही संधी
  • ऋजुता लुकतुके

आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन मंडळाने संघ निवड जाहीर केली आहे. आणि यात अनेक आश्चर्याचे धक्के आहेत. भारतीय वंशाच्या तन्वीर सांगाचीही निवड झाली, एकही आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव नसताना. भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला प्राथमिक संघ जाहीर केला आहे. आणि यात भारतीय वंशाचा फिरकीपटू तन्वीर सांगाचाही वर्णी लागली आहे. तन्वीर सिडनी थंडर्स संघाकडून स्थानिक टी-२० लीग खेळतो. आणि तो ॲडम झंपा आणि ॲश्टन एगरच्या बरोबरीने संघातील तिसरा फिरकीपटू असेल.

मागच्या बारा महिन्यात ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या मिशेल स्वेपसन आणि मॅट कुन्हेमान यांना वगळून तन्वीरचा समावेश झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. खासकरून कुन्हेमानने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सहा बळी मिळवले होते. तरीही त्याला वगळण्यात आलं आहे. शिवाय तन्वीर सांगा मागचं वर्षभर क्रिकेटपासून दूर आहे. त्याचं पाठीचं हाड मोडलं होतं. असं असताना त्याची प्रथमश्रेणी क्रिकेटमधील कामगिरी पाहून इतर अनुभवी फिरकीपटूंच्या वर तन्वीरची निवड झाली आहे.

(हेही वाचा – Best Strike : सलग आठ दिवसांनंतर अखेर बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला)

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बिग बॅश या टी-२० लीगमध्ये तन्वीर स्टार खेळाडू आहे. सिडनी थंडर्स संघाकडून खेळताना दोन हंगामात मिळून त्याने ३७ बळी टिपले आहेत. मोक्याच्या क्षणी बळी मिळवण्याची हातोटी त्याच्याकडे आहे. आणि आंद्रे रसेल या अनुभवी खेळाडूने त्यासाठी त्याचं कौतुक केलं आहे. याशिवाय तन्वीर ५ अ दर्जाचे सामने आणि ८ प्रथमश्रेणी सामने खेळला आहे. ऑस्ट्रेलियाच्या टी-२० संघात त्याची निवड यापूर्वी झाली आहे. पण, अंतिम बारामध्ये त्याला स्थान मिळू शकलेलं नाही.

२१ वर्षीय तन्वीरची दखल क्रिकेट जगताने सर्वप्रथम घेतली ती २०१९ च्या युवा विश्वचषक स्पर्धेत. आपल्या लेगस्पिन गोलंदाजीने त्याने २१ बळी टिपले. आणि ते ही षटकामागे ४ धावांची सरासरी राखत त्या स्पर्धेतला तो चौथा भेदक आणि यशस्वी गोलंदाज ठरला होता. तर फिरकीपटूंमध्ये तोच आघाडीवर होता. ऑस्ट्रेलियाला सध्या नॅथन लिऑनच्या जोडीला दुसऱ्या फिरकीपटूची गरज आहे. त्यासाठी ॲडम झंपा आणि तन्वीर सांगा दरम्यान चुरस असेल. अर्थात, तन्वीरसाठी अंतिम पंधरा जणांच्या संघात स्थान मिळवणं हे मोठंच आव्हान असेल. आता निवडलेला प्राथमिक संघ आगामी दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळेल. आणि त्यातूनच अंतिम संघ निवडला जाईल अशी शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.