ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा केवळ हलक्या सरींसह निघून गेला. सध्याच्या वातावरणात मुसळधार पावसाची कोणतीही चिन्हे नसल्याची माहिती हवामान अभ्यासकांनी दिली. मुंबईत पुढील दहा ते बारा दिवस मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान अभ्यासकांच्या गटाने सांगितले.
देशात जून महिन्यात पावसाचे आगमन झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देशात जास्त पाऊस होतो. मात्र, मुंबईत यंदा जुलै महिन्यात विक्रमी पाऊस झाला. दोन हजार मि. मीपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली. सध्या मुंबईत दिवसा ढगाळ वातावरण आहे. मुंबईत रात्री एखाददुसरी मोठी सर येते. कमाल आणि किमान तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. मंगळवारी कमाल तापमान ३२ तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअसवर नोंदवले जाईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला.
(हेही वाचा – शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता स्वाभिमानीतही फूट ? रविकांत तुपकर दुसरा गट स्थापन करणार)
परिणामी दुपारच्या सत्रात ढगाळ आणि उन्हाचा अनुभव येऊ लागला आहे. संध्याकाळी क्वचित प्रसंगी हलकी सर मुंबईकरांना अनुभवायला मिळत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने पुढील पाच दिवसाच्या अंदाजासाठी हलक्या पावसासाठी ग्रीन अलर्ट दिला आहे. ग्रीन अलर्टमध्ये पावसाची धूसर शक्यता असते, त्यामुळे मुंबईत तूर्तास मोठ्या सरींची शक्यता नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community