Rajini the Jailer : रजनीकांतच्या बहुचर्चित सिनेमाने आगाऊ बुकिंगचे सर्व विक्रम मोडले

तामिळ आणि तेलुगूबरोबरच हिंदीतही प्रदर्शित होणार आहे

318
Rajini the Jailer : रजनीकांतच्या बहुचर्चित सिनेमाने आगाऊ बुकिंगचे सर्व विक्रम मोडले
Rajini the Jailer : रजनीकांतच्या बहुचर्चित सिनेमाने आगाऊ बुकिंगचे सर्व विक्रम मोडले

ऋजुता लुकतुके

रजनीकांतच्या कुठल्याही सिनेमाबद्दल फक्त भारतातच नाही तर जगभरात उत्सुकता असतेच. जेलर हा त्याचा नवीन सिनेमा १० ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाने बुकिंगचे नियम मोडायला सुरुवात केली आहे. रजनीकांत या तामिळ सुपरस्टारचा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर त्याची उत्सुकता जगभरातल्या रजनी चाहत्यांना असते. पण, यावेळी ‘रजनी द जेलर’ या चित्रपटाने कहर केला आहे. अजून सिनेमा प्रदर्शित व्हायला दोन दिवस बाकी आहेत. पण, अमेरिका आणि भारतातही सिनेमाचं विक्रमी आगाऊ बुकिंग झालं आहे. बंगळुरू आणि चेन्नईत तर काही कार्यालयांनी चित्रपट पाहण्यासाठी कर्मचाऱ्यांना सुटी दिली आहे.

सन पिक्चर्सची निर्मिती असलेला हा चित्रपट नेलसन दिलीप कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. खुद्द रजनीकांत यांच्यासाठी हा कमबॅक चित्रपट आहे. तामिळ आणि तेलुगूबरोबरच हिंदीतही तो प्रदर्शित होणार आहे. अमेरिकेत ९ ऑगस्टला सिनेमाचा प्रिमिअर शो आयोजित करण्यात आला आहे. आणि त्यासाठी चक्क ४ कोटी रुपयांच्या वर आगाऊ बुकिंग झालं आहे. तिकीट विक्रीसाठी अजून दोन दिवस बाकी आहेत. आणि प्रेक्षकांचा कल असाच राहिला तर पहिल्या दिवशी हा चित्रपट अमेरिकेत ८ कोटींची कमाई करेल असा जाणकारांचा अंदाज आहे. इंग्लिशेतर चित्रपटाला मिळालेलं अमेरिकेतलं हे सगळ्यात मोठं ओपनिंग असेल. अलीकडेच अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये टाईम्स स्केअरवर या चित्रपटाचा प्रोमो दाखवण्यात आला. तिथे अमेरिकन प्रेक्षकही रजनीकांतच्या तालावर नाचताना दिसले.

(हेही वाचा – एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघात अनेक नवे चेहरे; भारतीय वंशाच्या तन्वीर संगालाही संधी)

याबरोबरच चित्रपटातील हुकूम आणि कवाला हा गाणीची सोशल मीडियावर गाजत आहेत. यापैकी कवाला गाणं एका महिन्याच्या आत १० कोटींच्या वर लोकांनी पाहिलं आहे. याशिवाय चित्रपटाची गाणी, प्रोमो आणि शोकेसही युट्‌यबूवर गाजतायत. भारतात तर आगाऊ बुकिंगने या आधीच ८ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. आणि अंदाजाप्रमाणे सगळं घडलं तर आगाऊ बुकिंग आणखी एका दिवसांत १० कोटींच्या वर जाऊ शकेल. अलीकडे प्रसिद्ध दिग्दर्शक मणी रत्नम यांच्या पोनियन सेल्वन २ या आणखी एका चित्रपटाला पहिल्याच दिवशी तगडं वर बुकिंग मिळालं होतं. या सिनेमाकडे सुपरस्टार रजनीकांत यांचा पुनरागमनाचा सिनेमा म्हणूनही पाहिलं जातंय. २०२१ मध्ये त्यांचा अन्नाथे हा सिनेमा आला होता. पण, तो तिकीटबारीवर अपयशी ठरला. यावेळी मात्र जेलरच्या प्रोमोपासून चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.