No Confidence Motion : …तर तुम्हाला औकात दाखवू; नारायण राणेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल 

138
Narayan Rane : लोकसभेच्या विजयाचा फायदा पदवीधर निवडणुकीत होईल - नारायण राणे

हिंदुत्व आणि खरी शिवसेनेबाबत बोलतात पण अरविंद सावंत शिवसेनेत कधी आले? मी १९६६ चा शिवसैनिक आहे. हे आम्हाला शिवसेनेबाबत बोलणार का? मी पक्ष सोडला, २२० लोकांनी आंदोलन केले होते. आता काहीच शिल्लक नाही. आता आवाज येतोय तो मांजराचा आहे, वाघाचा नाही. पंतप्रधानांवर बोलण्याची त्यांची औकात नाही. भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडे बोट दाखवाल तर तुमची औकात दाखवू असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.

राणेंच्या भाषणावेळी ठाकरे गटाच्या खासदारांनी त्यांच्यावर आरोप लावले तेव्हा राणे भडकले. त्यांनी त्यांच्याकडे बघून इशारा दिला तेव्हा लोकसभा सभापतींनी वैयक्तिक बोलू नका, माझ्याकडे बघून भाषण करा अशी सूचना राणेंना केली.

मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांनी लोकसभेत मंगळवारी, ८ ऑगस्ट रोजी अविश्वास प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावेळी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून खासदार श्रीकांत शिंदे , ठाकरेंकडून अरविंद सावंत तर भाजपाकडून मंत्री नारायण राणे बोलायला उभे राहिले. श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या भाषणात हिंदुत्व आणि गद्दारीवरून ठाकरे गटाला टोला लगावला. तर अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला पळपुटे म्हटले. सावंतांच्या भाषणानंतर नारायण राणे यांनी शिंदे गटाची बाजू घेत ठाकरे गटाच्या खासदारांना इशारा दिला. काही लोक गद्दारांसोबत अमित शाह बसलेत असे बोलतात, पण २०१९ च्या निवडणुकीत तुम्ही कोणाचे फोटो लावून निवडून आला? सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार दावणीला बांधले. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे बाळासाहेब बोलायचे. निवडणूक एकासोबत लढली आणि खुर्चीसाठी विचार बाजूला ठेवत अनैतिक सरकार बनवले. काँग्रेससोबत शिवसेनेची युती होईल असं कुणाला वाटले नाही. लोकांसोबत गद्दारी करण्याचे काम काँग्रेससोबत जाणाऱ्यांनी केले. १३ कोटी जनतेशी गद्दारी केली. ज्यांनी कारसेवकांवर गोळी चालवण्याचे काम केले त्यांच्यासोबत गेले. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना यांनी जेलमध्ये टाकले. शिवसेना म्हणून आम्ही सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावाचा विरोध करतो असं म्हटलं.

(हेही वाचा No Confidence Motion : श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; UPA काळातील भ्रष्टाचारांची वाचून दाखवली यादी )

या भाषणानंतर मंत्री नारायण राणे बोलायला उभे राहिले तेव्हा राणे आणि ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अविश्वास प्रस्तावावर अनेकांची भाषणे ऐकली, आत्ताच अरविंद सावंत यांचे भाषण ऐकताना मी दिल्लीत नाही तर महाराष्ट्राच्या विधानसभेत बसलोय असं वाटलं. अविश्वास प्रस्तावावर सावंतांनी श्रीकांत शिंदेंना उत्तर देण्याचे काम केले. हिंदुत्वाची भाषा केली. उद्धव ठाकरे गटाचे हिंदुत्वाबाबत बोलले. हिंदुत्वाबद्दल इतकं प्रेम होतं मग २०१९ मध्ये सत्तेसाठी शरद पवारांसोबत गेले तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही का?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.