Dinner : रात्रीच्या जेवणातील ‘या’ चुका ठरू शकतात वजन वाढीसाठी कारणीभूत

171

बरेच लोकं आपल्या नियमित दिनचर्येत अशा अनेक चुका करतात, ज्या दिसायला अगदी सामान्य असतात, पण प्रत्यक्षात त्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतात. रात्रीच्या जेवणादरम्यान आपल्या काही चुकांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम फक्त आतड्यांच्या आरोग्यावर होत नाही तर झोपेवरही होतो. तसेच या चुकांमुळे तुम्ही लठ्ठही होऊ शकता. तुम्हालाही वाढलेल्या वजनाचा त्रास जाणवत असेल किंवा वेट लॉस डाएट करूनही योग्य परिणाम दिसत नसेल तर तुम्हीही रात्रीच्या जेवणादरम्यान या चुका करत नाही ना हे तपासा.

रात्रीच्या जेवणातील या चुका वाढवू शकतात तुमचं वजन

रात्री झोपण्याच्या कमीत कमी दीड ते दोन तास आधी जेवल्याने पचनसंस्थेला अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळतो. ते शरीरातील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जसजशी रात्र वाढते तसतसे चयापचय म्हणजेच मेटाबॉलिज्म मंदावते. म्हणूनच रात्री जितक्या लवकर जेवू तितकेच चांगले. त्यामुळे पचन योग्य होते व वजन कमी करण्यासही फायदा होतो. रात्री उशिरा जेवणे हे वजन वाढण्याचे प्रमुख कारण आहे. रात्रीच्या जेवणात शक्य तितके हलके अन्न पदार्थ खावेत. रात्रीचे जेवण हलके केल्याने अनेक फायदे होतात. विशेषत: त्यामुळे पचन प्रक्रिया संतुलित राहते व ते वजन कमी करण्यास मदत करू शकते. जर तुम्ही वजन कमी करणारा आहार घेत असाल तर तुम्ही तुमचे रात्रीचे जेवण अगदी हलके ठेवावे. यशस्वी वेट लॉस जर्नीसाठी पुरेशा प्रमाणात प्रोटीन व फायबरचे सेवन गरजेचे आहे. या पोषक तत्वांकडे दुर्लक्ष केल्यास मेटाबॉलिज्मवर प्रभाव पडू शकतो. प्रोटीन आणि फायबर यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहते व सारखी भूक लागत नाही. त्यामुळे ते पुरेशा प्रमाणात खावे व ओव्हरइटिंग टाळावे. जास्त मीठयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. त्यामुळे सोडिअमच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे. अनेक लोक रात्रीचे जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खातात, पण हे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. गोड, साखरयुक्त मिठाई शरीरात अतिरिक्त कॅलरीज ॲड करते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

(हेही वाचा Veer Savarkar : आद्य हिंदी राष्ट्रध्वज स्टूटगार्टमध्ये फडकावलेल्या घटनेला झाली ११५ वर्षे; सावरकर स्मारकात जागवल्या स्मृती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.