केईएम रुग्णालयात आणली जाणार जंतुसंसर्गाचे निदान करणारी मशीन!

भोपाळ आणि नागपूर एम्सनंतर आता केईएम रुग्णालयात ही सेवा उपलब्ध झाली आहे

197
KEM Hospital : शस्त्रक्रियागृहात रिमोट अलार्मसह मेडिकल आयसोलेशन
KEM Hospital : शस्त्रक्रियागृहात रिमोट अलार्मसह मेडिकल आयसोलेशन

केईएम रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेपाठोपाठ आता रुग्णसेवेसाठी अत्याधुनिक मशिन्स आणल्या जाणार आहेत. रुग्णाच्या शरीरात जिवाणू आणि बुरशीजन्य आजाराबाबत निदान करून देणारी जंतुसंसर्ग मशीन आणली जाणार आहे. या मशीनची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. भोपाळ आणि नागपूर एम्सनंतर आता केईएम रुग्णालयात ही सेवा उपलब्ध झाली आहे.

कोरोनाकाळानंतर देशातील पालिका आणि सरकारी रुग्णालयात जंतू आणि विषाणू संसर्गावर काम करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या होत्या. त्यासाठी वेगवेगळ्या जंतू आणि विषाणू संसर्ग निदान आणि उपचाराकडे डॉक्टरांनी लक्ष केंद्रित केले होते. विटेक एमएक्स प्राईम ही मशीन रुग्णालयाने खरेदी केली आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्यावतीने रुग्णांसाठी ही मशीन वापरली जाईल. रुग्णाला होणाऱ्या विषाणू आणि इतर घातक संसर्गाचे निदान काही तासातच होईल. यात माइकोबैक्टीरियम आणि नॉन ट्यूबरक्युलोसिस जंतूचे निदान शक्य होते. विटेक एमएक्स प्राईम ही मशीन एमएएलडीआय टीओएफ या तंत्रज्ञानावर आधारित आहे. या मशीनमध्ये अतितीव्र सूक्ष्मजीव ओळखता येतात. तब्बल एक कोटी रुपये खर्च करून ही मशीन खरेदी करण्यात आली.

(हेही वाचा – APEDA : ‘अपेडा’कडून ताज्या डाळिंबाची प्रथम निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना)

सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या डॉ. एल के छाया यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन मशीनमध्ये १६ स्लाईड्स आहेत. एका सलाईड्समध्ये ४८ नमुन्यांची तपासणी होते. एकावेळीच ७६८ नमुन्यांची तपासणी या मशीनद्वारे शक्य होणार आहे. साधारणत परंपारीक चाचण्यांमध्ये जिवाणू संसर्गाचे निदान दोन दिवसांत होते. बुरशीजन्य आजारासाठी जीवणू निदनासाठी पाच दिवसांचा कालावधी लागतो. विटेक एमएक्स प्राईम या मशीनच्या माध्यमातून काही तासात अहवाल उपलब्ध होतो. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विटेक एमएक्स प्राईम या मशीनच्या माध्यमातून निदान अल्पकाळात उपलब्ध होईल. त्यामुळे रुग्णाच्या औषधोपचारपद्धतीवरही तातडीने काम करता येईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.