सुहास शेलार
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) लवकरच अजित पवारांना समर्थन देऊन मंत्रिपदाची शपथ घेतील, असे संकेत मिळत असताना, अचानक या चर्चा थांबल्या आहेत. याचा अर्थ त्या केवळ वावड्या होत्या असे नाही, तर पाटील यांनी सत्तेत सहभागी होण्याची चाचपणी केली; पण त्यांना हवे असलेले मंत्रिपद सोडण्यास भाजपाने नकार दिल्याने तूर्त जयंत पाटलांचा सत्ताप्रवेश रखडल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.
जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह त्यांचे भाचे प्राजक्त तनपुरे, राजेश टोपे, मानसिंग नाईक आणि सुनील भुसारा हे शरद पवार यांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यापैकी पाटील आणि टोपे यांच्यासाठी दोन कॅबिनेट मंत्रीपदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. तर, तनपुरे यांना महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्रीपद दिले जाणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान त्याबाबतच्या प्राथमिक चर्चा झाल्या आहेत.
(हेही वाचा – APEDA : ‘अपेडा’कडून ताज्या डाळिंबाची प्रथम निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना)
मात्र, जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महसूल मंत्रिपदाचा आग्रह धरल्याने त्यांच्या सत्ताप्रवेशात अडथळे निर्माण झाले आहेत. भाजपा त्यांना हे पद सोडण्यास तयार नाही. कारण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असलेले महसूल मंत्रालयही त्यांना दिल्यास सगळी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे गेल्याचा संदेश जनतेत जाईल. त्यामुळे महसूलऐवजी जलसंपदा खाते जयंत पाटील यांनी सांभाळावे, असे भाजपाचे म्हणणे आहे. परंतु, जयंत पाटील (Jayant Patil) आपल्या मागणीवर ठाम असून, महसूल किंवा त्याच्यावरचे खाते दिले, तरच पुढचा विचार करू, असा संदेश त्यांनी पाठविल्याचे कळते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेट ठरली होती. मात्र, पाटील महसूल खात्यावर अडून बसल्याने, फडणवीस आणि अजित पवारांनी त्यांना शहांसमोर आणले नाही. मंत्रिपदाचा तिढा सुटल्यानंतर ही भेट होईल, असे कळते.
आव्हाड, देशमुख नकोसे
राष्ट्रवादीचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना अजित पवार गटात सामील करून घेण्यास देवेंद्र फडणवीस यांनी विरोध दर्शविला आहे. त्याचप्रमाणे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतही भाजपने नकाराचीच भूमिका घेतल्याचे कळते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community