Nana Patole : प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना काँग्रेस हायकमांडने झापले?

ओबीसी, परिवर्तनवादी चळवळीतील बुद्धीवादी व्यक्तिमत्वं हरपलं

182
Nana Patole : प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना काँग्रेस हायकमांडने झापले?

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना हायकमांडने झापल्याची माहिती समोर येत आहे. भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याबाबत घोषणा करून राहुल गांधींची वाहवा मिळवण्याचा प्रयत्न त्यांच्या अंगाशी आला आहे.

राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल झाल्यानंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर परखड टीका केली. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना खुश करण्याच्या उत्साहात भारत जोडो यात्रेबाबतची माहिती फोडली. लवकरच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होईल, अशी घोषणा पटोले यांनी करून टाकली.

यासंदर्भात हायकमांडने तीव्र नाराजी व्यक्त करीत नाना पटोले (Nana Patole) यांना झापले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने याबाबत अद्याप कोणतीही वाच्यता केली नसताना, तुम्ही परस्पर तारीख कशी काय जाहीर केली, असा सवाल हायकमांडने उपस्थित करताच पटोले बॅकफूटवर आले. त्यांनी तातडीने प्रदेश काँग्रेसच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना खुलासा प्रसिद्ध करण्याची सूचना करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.

(हेही वाचा – State Bank : रिलायन्सला मागे टाकत स्टेट बँक ठरली देशातील सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी)

काँग्रेसच्या खुलाशात काय?

– काही माध्यमांनी १६ ऑगस्टपासून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे, त्यासंदर्भातील खुलासा.

– महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मंगळवारी गांधीभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर महाराष्ट्रात काँग्रेसची पदयात्रा १६ ऑगस्टनंतर सुरू होईल, असे म्हटले आहे.

– भारत जोडो यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची कोणतीही तारीख काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेली नाही. यासंदर्भातला निर्णय अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि स्वतः राहुल जी गांधी घेतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.