देशाच्या विकासासाठी अनेक वाईट गोष्टीचा त्याग करावा लागेल. यामुळेच भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाने भारत कायमचा सोडायला हवा, असे आव्हान करीत भाजप देशसेवा करण्यासाठी बाध्य असल्याचे स्पष्ट मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारही आजपासून मेरी माटी-मेरा देश अभियान सुरू करणार आहे. 30 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेअंतर्गत देशभरात शहीद जवानांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होणार आहेत.
नऊ ऑगस्ट रोजी भारत छोडो आंदोलन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला. यामध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली.
(हेही वाचा – India Food Grain Shortage : अन्नधान्याचा तुटवडा भासू नये म्हणून सरकार प्रयत्नशील)
शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिफलक लावण्यात येणार असून, त्यावर पंतप्रधान मोदींचा संदेशही असेल. याशिवाय तिन्ही दलांचे सैनिक देशभरातील ग्रामपंचायतींना भेट देतील.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “9 ऑगस्ट ही तारीख भारताच्या सर्वात मोठ्या इतिहासाची साक्षीदार आहे. 9 ऑगस्ट रोजी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलन सुरू झाले. बापूंनी इंग्रजांना भारत सोडून जाण्यास सांगितले होते. यानंतर देशात प्रबोधनाचे वातावरण निर्माण झाले. अखेरीस इंग्रजांना भारत सोडावा लागला.”
भाजप खासदार रविशंकर प्रसाद म्हणाले की, “आज पंतप्रधानांनी भ्रष्टाचार, परिवारवाद आणि तुष्टीकरणाला भारत सोडण्याचे आवाहन केले आहे. देशाची लोकशाही वाचवायची असेल तर या दुष्टांना देश सोडावा लागेल.”
मेरी माटी-मेरा देश अभियानांतर्गत अमृत कलश यात्राही काढण्यात येणार आहे. यामध्ये देशभरातील गावांमधून 7500 कलशांमध्ये माती दिल्लीत आणली जाणार आहे. यासोबतच यात्रेदरम्यान देशाच्या विविध भागांतून रोपेही आणली जाणार आहेत.
या मातीपासून आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळील वनस्पतींपासून अमृत वाटिका तयार केली जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी 30 जुलै रोजी मन की बात कार्यक्रमात या मोहिमेची घोषणा केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community