महाराष्ट्रात सर्वात आधी सरकार पाडण्याची सुरुवात शरद पवार यांनी केली, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टीका केली. संसदेच्या अधिवेशनात इतिहासाची आठवण करून देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेला अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर 8-10 ऑगस्टदरम्यान चर्चा होणार आहे. या प्रस्तावावर काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी चर्चा सुरू केली आहे. यावेळी भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती. भाजपाने 9 वर्षांत 9 सरकारे पाडल्याचा आरोप त्यांनी केला.
(हेही वाचा लोकसभेतील भाषणानंतर राहुल गांधी आले चर्चेत; का सुरु झाला #Pappu ट्रेंड?)
शहांनी करुन दिली इतिहासाची आठवण
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही 9 वर्षात 9 सरकारे पाडली. मात्र, सर्वात पहिले महाराष्ट्रात कुणी जर सरकार पाडले असेल तर ते शरद पवार यांनी पाडले. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडत भारतीय जनसंघाच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री झाले होते. भाजपचा नाही तर भारतीय जनसंघाचा पाठिंबा घेऊन ते मुख्यमंत्री झाले अशी आठवण करून देतानाच सत्ता कुणी भोगली मुख्यमंत्री कोण झाले असा सवालही उपस्थित केला.
Join Our WhatsApp Community