टोमॅटो ही एक अशी फळभाजी आहे जीचा वापर शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही पदार्थांमध्ये केला जातो. मात्र सध्या बाजारात टोमॅटोच्या दराने शंभरी पार केल्याने अनेकांच्या जेवणातून टोमॅटो गायब झाला आहे. त्याप्रमाणे आता सर्वसामान्य माणसांच्या जेवणातून कांदा (Onion Price Hike) देखील गायब होण्याची चिन्ह दिसत आहेत. कांद्याच्या दरामुळे आता लोकांच्या डोळ्यात पाणी येणार आहे. टोमॅटो आणि इतर भाजीपाल्यांसोबत आता कांद्यांच्या दरातही वाढ होणार आहे. याचाच परिणाम आता जेवणाच्या थाळीवरही झाला आहे.
नुकत्याच रेटिंग एजन्सी क्रिसिलने जाहीर केलेल्या अहवालानुसार, शाकाहारी (Onion Price Hike) थाळी २८ टक्क्यांनी तर, मांसाहारी थाळी ११ टक्क्यांनी महाग झाली आहे. माहितीनुसार आता भविष्यात कांदा ३० ते ४० रूपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचा – Mhada : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे ४,०८२ सदनिका विक्रीसाठी १४ ऑगस्टला संगणकीय सोडत)
म्हणून कांद्याचे दर वाढले
सततचा मुसळधार पाऊस आणि त्यानंतरचा पूर याचा अनेक शेतपिकांवर परिणाम झाला आहे. तसाच तो कांद्यावरही (Onion Price Hike) झाला आहे. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून कांद्याचा (Onion Price Hike) पुरवठा आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. साठ्यात ठेवलेला कांदा पुढील महिन्यापासून बाहेर पडण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव वाढणार आहेत. सध्या कांदा ३० रुपये किलोने किरकोळ बाजारात विकला जातोय. मात्र, व्यापारी ज्या प्रकारे चिंता व्यक्त करत आहेत, त्यावरून भविष्यात कांदा (Onion Price Hike) ४० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community