लोकसभेत बुधवारी (९ ऑगस्ट) अविश्वास प्रस्तावावरील (No-Confidence Motion) चर्चेत भाग घेतांना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यांच्या टीकेला भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी चोख उत्तर दिले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील काँग्रेसवर टीका केली. त्यानंतर आज म्हणजेच गुरुवार १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी नक्की काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
(हेही वाचा – Onion Price Hike : टोमॅटोनंतर आता कांदाही महागणार; एका किलोमागे ‘इतके’ रुपये वाढणार)
मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर (No-Confidence Motion) लोकसभेत ८ ऑगस्टपासून चर्चा सुरु झाली. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात करताना विरोधकांचा अजेंडा मणिपूर (Manipur Violence) असेल, असं स्पष्ट केलं होतं. सन २०१८ मध्येही मोदींना अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावं लागलं होतं. तेव्हाही विरोधकांकडे संख्याबळ नव्हतं. आजही मतदान झाल्यास अविश्वास ठराव फेटाळला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
The PM will be present in the House tomorrow to reply to the no-confidence motion: Defence Minister Rajnath Singh in Lok Sabha pic.twitter.com/ZxPXudPmMJ
— ANI (@ANI) August 9, 2023
म्यानमारमुळे मणिपुरात हिंसाचार – अमित शाह
लोकसभेत सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील (No-Confidence Motion) चर्चेत बोलताना, गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरशी संबंधित घडामोडी आणि तिथे शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप करत शाह म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूर दौऱ्यात रस्त्यावरुन जाण्याचा आग्रह धरला, मात्र ते शांतपणे हवाई मार्गाने जाऊ शकले असते. अमित शाह म्हणाले की, ‘ही वेळ राजकारण करण्याची नाही, ही बाब विरोधकांनी समजून घेतली पाहिजे. जनतेला सर्व काही कळतं आणि जनता सर्वकाही जाणते हे त्यांना कळायला हवं. तसेच म्यानमारमुळे मणिपुरात हिंसाचार होत आहे. सीमा खुली असल्याने म्यानमारमधून मोठ्या संख्येने कुकी नागरिक मिझोराम आणि मणिपूरमध्ये आले. असेही अमित शहा यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community