मुंबईत कोविडनंतर स्थलांतर मोठ्या प्रमाणात पुन्हा सुरु झाले. या स्थलांतरीत समुदायात कुष्ठरोग मोठ्या प्रमाणात सापडू लागला आहे. रुग्ण शरीरात कुष्ठरोग पूर्णपणे विकसित झाल्यानंतर येत असल्याची माहिती कुष्ठरोगावर काम करणाऱ्या संस्थांनी दिली. गेल्या वर्षांपासून ६२६ लोकांना कुष्ठरोगाची बाधा झाली आहे. कोविडनंतर पहिल्यांदा एवढी मोठी वाढ पाहायला मिळाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. मुळात गेल्या दहा वर्षात कुष्ठरोग्यांमध्ये दुसऱ्यांदा एवढी मोठी वाढ दिसून आली. याआधी २०१३-१४ साली ६२७ कुष्ठरोगी सापडले होते. गेल्या वर्षांपासून सापडलेले ६२७ रुग्णांपैकी ७७ टक्के रुग्ण प्रगत अवस्थेत सापडले आहेत.
कुष्ठरोग म्हणजे काय?
कुष्ठरोग या आजारात रुग्णच्या शरीरात कायमस्वरूपी विकृती निर्माण होते. मायक्रोबॅक्टेरियम लेप्री या विषाणूमुळे रुग्णाला कुष्ठरोग होतो. दहा वर्षांपूर्वी कुष्ठरोग ही गंभीर समस्या होती. कुष्ठरोग बळकावल्यास मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करणे रुग्णांना कायमस्वरूपी विकलांग करू शकते.
कुष्ठरोगाचे प्रकार –
कुष्ठरोगाचे पॉसिबेसिलरी (पिबी) आणि मल्टीबेसिलरी (एमबी) असे दोन प्रमुख प्रकार आहेत. शरीरात एक ते पाच बधीर ठिपके आणि रक्तवाहिनी प्रभावित झाल्यास पिबी श्रेणी येते. पाचपेक्षा जास्त संवेदनाहीन डाग आणि दोन नसा प्रभावित झाल्यास रुग्ण एमबीच्या श्रेणीत येतो.
(हेही वाचा – Medical Colleges : नव्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रभारी अधिष्ठात्यांची नियुक्ती)
गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी –
वर्ष रुग्ण –
२०१८-१९ ४७४
२०१९-२० ४५३
२०२०-२१ १६६
२०२१-२२ ३३५
२०२२-२३ ६२६
बालकांनाही लागण –
वर्ष रुग्ण –
२०१७-१८ ५८
२०१८-१९ ४७
२०१९-२० ३८
२०२०-२१ ०७
२०२२-२३ ४८
हेही पहा –
Join Our WhatsApp Community