आले जीमेलचे नवे फिचर!; आता मोबाईलवरही आवडत्या भाषेत तुम्ही करू शकता मेलचे भाषांतर

हे फिचर मोबाईल जीमेल वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले आहे

235
आले जीमेलचे नवे फिचर!; आता मोबाईलवरही आवडत्या भाषेत तुम्ही करू शकता मेलचे भाषांतर
आले जीमेलचे नवे फिचर!; आता मोबाईलवरही आवडत्या भाषेत तुम्ही करू शकता मेलचे भाषांतर

गुगलने आपल्या जीमेल अॅपमध्ये एक नवीन फिचर आणले आहे. या नव्या फिचरच्या माध्यमातून वापरकर्त्यांना आपल्या ई-मेलचे आवडत्या भाषेत भाषांतर करता येईल. हे फिचर मोबाईल जीमेल वापरकर्त्यांसाठी जारी करण्यात आले आहे. हे फिचर पूर्वी फक्त वेबवर उपलब्ध होते. आता अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) डिव्हाईससाठी उपलब्ध झाले आहे.

‘इतक्या’हून अधिक भाषांमध्ये करता येणार भाषांतर

गुगलने (Google) एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अनेक वर्षांपासून, वापरकर्त्यांना १०० हून अधिक भाषांमध्ये वेबवर जीमेल मधील ई-मेल सहजपणे भाषांतरित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आजपासून हे फिचर जीमेल (Gmail) मोबाईल अॅपसाठी देखील जारी करत आहोत.” गुगल पुढे म्हणाले, “आम्‍ही नेटिव्ह ट्रान्सलेट इंटीग्रेशनची घोषणा करताना फार आनंदी आणि उत्‍साहित आहोत. याच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय एकाहून अधिक भाषांमध्‍ये संवाद साधण्‍यास मदत होईल.”

(हेही वाचा – Leprosy Patient : मुंबईत कुष्ठरोग वाढतोय!)

जीमेल भाषांतर फिचर कसे वापराल?

१. मेसेजचे भाषांतर करण्यासाठी, तुमच्या ईमेलच्या टॉपवर “अनुवाद करा” पर्यायावर क्लिक करा.

२. तुम्हाला मूळ भाषेत ई-मेल वाचायचा असल्यास तुम्ही भाषांतर पर्याय डिसमिस देखील करू शकता.

३. जेव्हा जीमेलला सामायिक केलेल्या भाषेपेक्षा भिन्न ई-मेलचा मजकूर आढळतो तेव्हा हे बॅनर पुन्हा दिसेल.

४. एखाद्या विशिष्ट भाषेसाठी भाषांतर बॅनर बंद करण्यासाठी, तुम्हाला “पुन्हा भाषेचे भाषांतर करू नका” वर टॅप करणे आवश्यक आहे.

५. सिस्टीम इतर कोणतीही भाषा शोधू शकत नसल्यास, तुम्ही (i) बटण (तीन ठिपके) वर टॅप करून स्वत: भाषांतर करू शकता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.