राज्यातील जे जे ते इतर १३ सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना लवकरच फाईल आणि पेनपासून मुक्ती मिळणार आहे. गेल्या वर्षभरापासून बंद असलेली हेल्थकेअर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस) सरकारी अधिकारी पुन्हा वैद्यकीय रुग्णालयात सुरु करणार आहेत. त्यासाठी सरकारने २६९.५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या प्रणालीसाठी लवकरच काम केले जाणार आहे. या कामासाठी संस्था कामाला लागली आहे असे वैद्यकीय शिक्षण विभाग आयुक्त राजीव निवतकर यांनी सांगितले.
प्रणालीचा वापर –
एचएमआयएस प्रणालीत रुग्ण नोंदणी ऑनलाईन केली जाते. रुग्णाला एक विशिष्ट ओळख क्रमांक दिला जातो. या क्रमांकावर डॉक्टर्स रुग्णाची माहिती जसे की आजार, सुचवलेली औषधे ऑनलाईन माध्यमात फीड करतात. याच प्रणालीत रुग्णाचा चाचणी अहवालही लिहिला जातो. रक्ताचे अहवाल, एक्स-रे, एमआरआय, सिटी स्कॅन आदी माहिती उपलब्ध होते. त्यामुळे कागदी कामामुळे विलंबाने होणारी कामे पटकन होतात.
(हेही वाचा – Satara Accident : कारच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू)
प्रणाली बंद होण्यामागील कारण –
ही सेवा २००८ साली जे जे रुग्णालयास इतर सरकारी रुग्णालयात सूरू झाली होती. या प्रणालीचे कंत्राट बंगळुरू येथील खासगी कंपनीला दिले गेले. मात्र, सरकारने पैसे वेळेवर न दिल्याने या खासगी कंपनीने तंत्रसेवा देणे गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यापासून बंद केली.
रुग्णसेवा डगमगली –
गेल्या वर्षभरापासून ही सेवा बंद असल्याने सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्णसेवा कोलमडली होती. केसपेपर काढण्यापासून ते प्रत्येक माहिती कागदावर लिहून देण्याच्या प्रकारात वेळ जास्त खर्च होऊ लागला. दुपारी चार वाजेपर्यंत बाह्य रुग्ण विभागाबाहेर रुग्णांची गर्दी दिसून आली. रुग्णालयात दाखल रुग्णांच्या अहवालाची माहिती उपलब्ध होण्यासाठी डॉक्टर्स आणि रुग्णाचे नातेवाईक व्हॉट्सअॅपचा वापर करू लागले.
तीन वर्षांसाठी मोफत –
नेशनल इन्फॉर्मशन सेंटरकडून उपलब्ध झालेली ही प्रणाली तीन वर्षांसाठी सरकारला मोफत पुरवली जाणार आहे. ही आज्ञावली सुरु करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community