Transport Department : समृद्धी महामार्गावरील ‘इतक्या’ वाहन चालकांवर परिवहन विभागाची कारवाई

ठराविक वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनांसाठी सॉफ्टवेअर विकसित

161
Transport Department : समृद्धी महामार्गावरील 'इतक्या' वाहन चालकांवर परिवहन विभागाची कारवाई
Transport Department : समृद्धी महामार्गावरील 'इतक्या' वाहन चालकांवर परिवहन विभागाची कारवाई

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर असलेल्या शिर्डी ते भरवीर मार्गिकेवरील अपघात रोखणे व सुरक्षितेच्या दृष्टीने २६ मे ते ३१ जुलै, २०२३ या कालावधीत प्रादेशिक परिवहन विभाग, नाशिक कार्यालयाच्या वायुवेग पथकाने ४ हजार ९७५ वाहन चालकांवर कारवाई केल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली आहे.

समृद्धी महामार्गावरील शिर्डी ते भरवीर या ८० किलोमीटर मार्गावर अपघात रोखण्यासाठी, वाहन तपासणी व वाहन चालकांचे समुपदेशन करण्यासाठी नाशिक प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कक्ष स्थापित केला असून, एन्ट्री व एक्झिट ठिकाणावर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांद्वारे वाहनांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. यात वाहनांचे टायर, वाहनातील अतिरिक्त प्रवासी, वाहनांनुसार लेन तपासणी, अनधिकृतपणे उभी केलली वाहने, ड्रंक अँड ड्राइव्ह बाबत ब्रेथॲनालायझरद्वारे तपासणी इत्यादी बाबींची तपासणी केली जाते. ठराविक वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणाऱ्या वाहनांसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. याद्वारे वाहन अतिवेगात असेल तर ते शोधले जाते.

(हेही वाचा – अनिल अंबानींनी लावलेला चुना राज्य सरकार पुसणार)

२६ मे ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत वायुवेग पथकाने केलेली कारवाई –

समृद्धी महामार्गावर वाहनाचे टायर अथवा वाहनाची योग्यता समाधानकारक आढळून न आल्याने प्रवेश नाकराण्यात आलेली ४२५२ वाहने, अतिरिक्त प्रवासी आढळून आलेली ३०५ वाहने, वाहनांना परावर्तक (रिप्लेव्टीव्ह टेप) न बसवलेली ११९ वाहने, चुकीच्या मार्गिकेतुन वाहन चालविणारी (Wrong Lane) १५८ वाहने, समृद्धी महामार्गावार अनधिकृतपणे उभी केलेली ११० वाहने व विहित केलेल्या वेगमर्यादेपेक्षा अतिवेगाने चालणारी ३१ वाहने अशी एकूण ४ हजार ९७५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. सर्व वाहनचालकांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर वाहन चालवितांना वाहतुकीच्या नियमांचे काटकोर पालन करावे असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.