विरोधकांची जी I.N.D.I.A. आघाडी झाली आहे, ती केवळ परिवाराला वाचवण्यासाठी बनवली आहे. यात इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी आहे जी सोनिया गांधी आणि त्यांचा मुलगा राहुल गांधी यांची आहे. दुसरी नॅशनल काँग्रेस पार्टी आहे, जी शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांची आहे. समाजवादी पार्टी मुलायम सिंग आणि त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांची आहे. सगळ्यांनी आपल्या मुलांना सेटल करण्यासाठी पक्ष बनवले आहेत. त्यामुळे मी निवडणूक आयोगाला विनंती करतो कि, जसे राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष आहेत तसे परिवारांचा पक्ष म्हणून नोंदणी केली जावी, असा घणाघाती हल्ला शिवसेना नेते, खासदार राहुल शेवाळे यांनी केला.
मणिपूर प्रकरणी विरोधकांनी मोदी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला आहे. त्यावरील चर्चेत सहभागी होताना खासदार राहुल शेवाळे यांनी या प्रस्तावाला विरोध केला. मणिपूर प्रकरणी विरोधकांनी मोदी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला आहे. त्यावरील चर्चेत सहभागी होताना खासदार राहुल शेवाळे यांनी या प्रस्तावाला विरोध केला. मणिपूरमध्ये आग लागली आहे, पण ती विझवण्याचे काम कुणी करत नाही. विरोधी पक्ष ती आग वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाय केले जात आहेत, याचा आढावा दिला. महाराष्ट्रातूनही तिथे सर्व मदत पाठवली जात आहे. मुख्यमंत्री शिंदे याकडे लक्ष ठेवून आहेत, असेही खासदार शेवाळे म्हणाले.
(हेही वाचा राहुल शेवाळेंनी सांगितला ‘भारत’ आणि ‘इंडिया’चा अर्थ; म्हणाले, I.N.D.I.A. शब्दात पारतंत्र्याचा वास )
I.N.D.I.A. आघाडी बनवण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ही लढाई जनविश्वासाच्या विरोधात अविश्वासाची आहे. विरोधकांनी I.N.D.I.A. आघाडी का बनवली आहे यामागे मुख्य कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा, हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचा संकल्प केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने संपूर्ण पक्षाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवले. हा फॉर्म्युला एनसीपीमध्ये वापरला जाईल तसेच अन्य पक्षही जे परिवार चालवत आहेत, त्यांना भीती वाटत होती कि त्यांच्याही पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा कुणी असेल, म्हणून ही आघाडी बनवण्यात आली, असेही खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community