Prakash Surve : आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर वनराईत गुन्हा दाखल

158

एका फायनान्स कंपनीच्या सीईओचे त्याच्या कार्यालयातून अपहरण करून त्याच्याकडून आर्थिक करारपत्र रद्द करण्यासाठी बळ जबरीने स्वाक्षरी घेऊन मारहाण केल्याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राजू सुर्वे आणि इतर १० ते १५ जणांविरुद्ध वनराई पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरेगाव पूर्व येथे ग्लोबल म्युझिक जंक्शन ही कंपनी ओटीटी डिजिटल कंपन्यांना कर्ज देते, या कंपनीने ५ वर्षांच्या करारावर आदिशक्ती प्रा. लिमिटेड या युट्युब चॅनेलचे मालक मनोज मिश्रा यांना ८ कोटींचे कर्ज दिले होते. मनोज मिश्रा याने पैसे परत न करता करार रद्द करण्यासाठी तगादा लावला होता, त्यासाठी तो ग्लोबल कंपनीच्या सीईओवर दबाब आणत होता.
बुधवारी दुपारी ग्लोबल कंपनीचे सीईओ राजकुमार सिंह यांना एक फोन आला व फोन करणाऱ्याने “मै आमदार प्रकाश सुर्वे के ऑफिस से बात कर रहा हु, आप इधर आ जाना, राजकुमार सिंह यांनी फोन करणाऱ्याला शनिवारी येतो म्हणून सांगत फोन कट केला. काही वेळाने ग्लोबल कंपनीच्या कार्यालयात १० ते १५ जण बळजबरीने घुसले व त्यांनी कंपनीचे सीईओ राजकुमार सिंह यांना बळजबरीने पिस्तुलचा धाक दाखवून मोटारीत बसवून आमदार सुर्वे यांच्या दहिसर येथील युनिव्हर्सल शाळेच्या शेजारी असलेल्या कार्यालयात आणण्यात आले.

(हेही वाचा PM Narendra Modi : फिल्डिंग विरोधकांनी लावली; आम्ही चौकार-षटकार मारले – पंतप्रधान मोदी)

त्या ठिकाणी आदिशक्ती युट्युब चॅनेलचा मनोज मिश्रा आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राजू सुर्वे आणि १० ते १५ जण उपस्थित होते. त्यांनी राजकुमार यांना मारहाण करून धमकी देत एका स्टॅम्प पेपर वर आदिशक्ती कंपनीसोबतचा करार रद्द झाला असल्याचा करारावर बळजबरीने राजकुमार सिंह यांचीही स्वाक्षरी घेण्यात आली असे राजकुमार सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान याबाबत पोलिसांना काही सांगू नको किंवा तक्रार केली तर परिणाम वाईट होईल अशी धमकी देखील देण्यात आली असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. वनराई पोलीस ठाण्यात स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यासह इतर जणांविरुद्ध अपहरण आणि शस्त्रास्त्र कायद्यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.