PM Narendra Modi : विरोधकांचे अपशब्द माझ्यासाठी टॉनिक – पंतप्रधान मोदी

181

विरोधक डिक्शनरी खोलून अपशब्द घेऊ आले आहेत. कुठून कुठून शोधून आणले. दिवसरात्र मला वाईट बोलण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांची आवडती घोषणा आहे की, मोदी तेरी कब्र खुदेगी..पण त्यांच्या शिव्या, असंवैधानिक भाषा..मी त्याचं टॉनिक बनवतो, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

“काही वर्षात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. जेव्हा आम्ही पुढच्या पाच वर्षांबाबत असा दावा करतो तेव्हा जबाबदार विरोधक काय करतात? प्रश्न विचारायला हवा की, कसं करणार? काय योजना आहे. पण ही बाबही मलाच शिकवावी लागते. ते याबाबत सूचनाही देऊ शकले असते. त्याचबरोबर निवडणुकीत जनतेसमोर जाताना आम्ही देशाची अर्थव्यवस्था एक नंबरवर आणू, असा दावा करायला हवं होतं. पण विरोधक असं काहीच करताना दिसत नाहीत. काँग्रेसचे लोकं काय करत आहेत. इतकं वर्षे सत्तेत राहूनही अनुभवहीन वक्तव्य करत आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

(हेही वाचा PM Narendra Modi : फिल्डिंग विरोधकांनी लावली; आम्ही चौकार-षटकार मारले – पंतप्रधान मोदी)

काँग्रेसचं स्वत:चं अस्तित्व नाही

विरोधकांनी इंडिया आघाडी बनवली, पण ही इंडिया (I.N.D.I.A) आघाडी नाही तर घमंडिया आघाडी असल्याचा टोला पीएम मोदी यांनी लगावला. यांच्या वराततीत सर्वांनाच नवरदेव बनायचं आहे, प्रत्येकाला पंतप्रधान बनयाचं आहे अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी केली आहे. यावेळी मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला. नाव बदलून देशावर राज्य करेल असे काँग्रेसला वाटतं. त्यांच्या नावावर रुग्णालयं आहेत. पण तिथं उपचार होत नाहीत. विमानतळावर त्यांचं नाव, पुरस्कार. स्वतःच्या नावावर,  अनेक योजना स्वत:च्या नावावर सुरु केल्या आणि मग त्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला. जनतेला काम पहायचे आहे पण त्यांना मिळालं फक्त एका घराण्याचं नाव, अशी टीका पंत्रधान मोदी यांनी केली.

काँग्रेसच्या नावाशी संबंधित काहीही त्यांच्या मालकीचं नाही. निवडणूक चिन्हापासून विचारापर्यंत सर्व काही दुसऱ्यांकडून उसनं घेतल्याचं पीएम मोदी यांनी सांगितलं. पक्षाचे संस्थापक ए ओ ह्यूम हे परदेशी होते. 1920 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला एक नवी ऊर्जा आणि ध्वज मिळाला. देशातील जनतेने तो स्विकारला. त्या झेंड्याची ताकद पाहून काँग्रेसने रातोरात ते चिन्ह चोरलं. तिरंगा ध्वज पाहून लोकांना वाटेल की तो जनतेचा आवाज आहे. इतकंच काय तर गांधी नावही चोरलं आहे असा हल्लाबोल पीएम मोदींनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.