हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा रोग आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई नजीकच्या ठाणे आणि पालघर मिळून १८ जिल्ह्यांमध्ये यंदाच्या वर्षांत ३० हजारांहून अधिक हत्तीरोगाचे रुग्ण आढळून आल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली. हत्तीपाय रुग्णांची संख्या ३० हजार ३३४ तर अंडाशयवृद्धी रुग्णांची संख्या ७ हजार २५६ एवढी दिसून आली.
विदर्भात नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि अकोला तर नांदेड तसेच नंदुरबार जिल्ह्यात अजूनही हत्तीरोगाचे रुग्ण आढळून येतात. हत्तीरोगावर सरकारी रुग्णालयात मोफत उपचार दिले जातात. परिणामी, हत्तीरोग आता आठ जिल्ह्यांतून पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. हत्तीरोग झाल्यानंतर त्यावर खात्रीशीर उपाय नाही. हत्तीरोगाची बाधा होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधांचे एकदाच सेवन करणे आवश्यक आहे.
(हेही वाचा – Kamgar Hospital : मरोळ कामगार रुग्णालय अखेर ‘या’ दिवशी होणार सुरु)
हत्तीरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागातील प्रतिबंधात्मक उपाययोजना पथक –
- हत्तीरोग सर्व्हेक्षण पथक ६
- हत्तीरोग नियंत्रण पथक १६
- हत्तीरोग रात्रचिकित्सालय ३४
हत्तीरोगाबाबत माहिती –
हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा रोग आहे. हत्तीरोग हा ‘क्युलेक्स विचकि फॅसिएटस’ नावाच्या अळ्यांमुळे होतो. भारतात हत्तीरोग प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तमिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश, आसाम, कर्नाटक या राज्यात आढळतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community