ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने विंडिज (IND vs WI) विरुद्धच्या टी-२० मालिकेत तिसरा सामना जिंकून आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. संघाने ७ गडी राखून मिळवलेला विजयही आश्वासक होता. त्यामुळे पाच सामन्यांची ही मालिका पुन्हा जिवंत झाली आहे. या मालिकेतील पहिले तीन सामने त्रिनिदाद आणि गयाना या वेस्ट इंडिजमधील शहरांमध्ये झाले.
पण, आता शेवटचे दोन सामने अमेरिकेत फ्लोरिडा (IND vs WI) राज्यांत होणार असल्यामुळे या सामन्यांबद्दल सगळीकडे उत्सुकता आहे. बीसीसीआयनेही खेळाडू विमानातून मियामी इथं लँड झाल्याचा व्हीडिओ ट्विटरवर टाकून ही उत्सुकता आणखी वाढवली आहे.
𝙏𝙤𝙪𝙘𝙝𝙙𝙤𝙬𝙣 Miami ✈️#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/SKJTbj0hgS
— BCCI (@BCCI) August 10, 2023
या व्हीडिओला २४ तासांच्या आत साडे तीन लाख इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोकांनी हजारोंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारतीय (IND vs WI) संघाला शुभेच्छा देणारे चाहते तर आहेतच. शिवाय मियामीमध्ये आहात तर मेस्सीला भेटा असं सांगणारे चाहतेही अनेक आहेत.
(हेही वाचा – Kamgar Hospital : मरोळ कामगार रुग्णालय अखेर ‘या’ दिवशी होणार सुरु)
शेवटच्या दोन सामन्यांत (IND vs WI) दमदार कामगिरी करणाऱ्या तिलक वर्माला सोशल मीडियावरही प्रतिसाद मिळत आहे.
अमेरिकेत क्रिकेटचा डंका?
या मालिकेच्या (IND vs WI) निमित्ताने अमेरिकेत क्रिकेट रुजवायचं महत्त्वाचं कामही होणार आहे. तसा अमेरिकेतील लोकप्रिय खेळ आहे बेसबॉल. हा खेळही बॅट तसंच चेंडूने खेळला जातो. त्यामुळे इथं क्रिकेटला तशी लोकप्रियता कधीच मिळाली नाही.
पण, १९६५ मध्ये अमेरिकन क्रिकेट बोर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे असोसिएट सदस्य बनले. तिथून अमेरिकेत या खेळाच्या प्रसारासाठी प्रयत्न सुरू झाले. गंमत म्हणजे २००६ मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात अमेरिकेत ३०,००० लोक वर्षाकाठी क्रिकेट बघतात किंवा खेळतात असा आकडा समोर आला होता. पण, २०१७ पर्यंत अचानक हा आकडा २,००,००० च्या घरात गेला.
आणि तेव्हापासून इथं खेळ रुजवण्याचे प्रयत्न सुरू झाले. शेजारी वेस्ट इंडिजची (IND vs WI) मदत त्यासाठी घेण्यात आली. यावर्षीपासून अमेरिकेत मेजर लीग टी-२० सुरू झाली आहे. तर आयसीसीने इथं आंतरराष्ट्रीय सामने भरवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
सन २०२४ चा टी-२० विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तपणे होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community