राज्यात मागील काही महिन्यांपासून अनेक भागात वेगवेगळ्या कारणांवरून वाद होऊन तणावाचे (Shirpur Riots) वातावरण निर्माण होत आहे. अशातच आता पुन्हा धुळ्यामधील शिरपूर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरपूर मधील सांगवी गावात सध्या संचारबंदी लावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी क्रांती दिनाचे पोस्टर फाडल्यामुळे हा वाद झाला. काही अज्ञात व्यक्तींनी पोस्टर (Shirpur Riots) फाडल्याने गुरुवारी (१० ऑगस्ट) सांगवी गावात दोन गटात तुफान दगडफेक आणि जाळपोळीचा प्रयत्न झाला. याप्रकरणी १० जणांना अटक करण्यात आली असून गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
(हेही वाचा – IND vs WI : भारतीय क्रिकेट संघ शेवटच्या दोन सामन्यांसाठी अमेरिकेत पोहोचला तो क्षण)
नेमका प्रकार काय?
सांगवीतील जोयदा (Shirpur Riots) रस्त्यावरील शाळेजवळ आदिवासी क्रांती दिनाचे पोस्टर फाडल्याचे वृत्त गावात पसरताच शेकडो आदिवासी बांधवांच्या संतप्त जमावाने दुसऱ्या समुदायावर दगडफेक केली. पोस्टर फाडणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी केली. यातून तणाव वाढून गावात काही ठिकाणी जोरदार दगडफेक सुरू झाली. काही टपऱ्या उलथवून टाकण्यात आल्या, तर काही पेटवण्याचा प्रयत्नही झाला. यासोबतच काही गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या.
परिस्थिती हाताबाहेर (Shirpur Riots) जात असल्याचे लक्षात येताच धुळे येथून एसआरपी, दंगल नियंत्रण पथक, जादा पोलिस बंदोबस्त तातडीने मागवण्यात आला. यासोबतच सांगवी गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत. त्यातील तीन जणांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात लक्ष्मण भील (वय १८), शिवदास आसाराम भील (वय ४०), सुभाष विजय सोनवणे यांना गंभीर मार लागल्याने त्यांना धुळे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सांगवी पोलिसांसह शिरपूर, धुळे आणि इतर ठिकाणाहून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती हाताळली. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले असून, त्यात काही जण गंभीर जखमी झाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community