Monsoon Update : उत्तराखंडासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

उत्तर प्रदेशात हलका ते जोरदार पाऊस पडू शकतो.

193
Monsoon Update : उत्तराखंडासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार (Monsoon Update) पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झालं आहे. लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिल्लीतही मुसळधार

आज, (११ ऑगस्ट रोजी) दिल्लीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार (Monsoon Update) पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

उत्तर प्रदेशात हलका ते जोरदार (Monsoon Update) पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान विभागा नुसार, ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान हलका पाऊस पडेल. उत्तराखंडमध्ये गेल्या महिन्यातही भरपूर पाऊस झाला होता. त्यामुळे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील नद्या दुथडी भरून वाहत असून, त्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी हवामान विभागाने राज्यात पावसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

१५ ऑगस्टनंतर मुसळधार पाऊस पडणार

राजस्थानमध्ये या आठवड्यात पावसाने (Monsoon Update) काहीशी विश्रांती दिली आहे. पुढील एक आठवडा राजस्थानमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकीकडे राजस्थानची ही परिस्थिती आहे तर दुसरीकडे मध्य प्रदेशात मात्र, पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १५ ऑगस्टनंतरच मध्य प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळतंय.

(हेही वाचा- ‘शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशन’ आणि ‘शिवाजी ब्रीज रेल्वे स्थानकाच्या’ नामांतराची खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी)

‘या’ राज्यांमध्ये पाऊस पडणार

हवामान विभागाने राज्यातील काही भागांचा पावसाच्या (Monsoon Update) धोरणाचा अभ्यास केला आहे. त्यानुसार, बिहार आणि झारखंडमध्येही पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय गुजरात, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगाल, ओरिसा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारी कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. पावसामुळे नागरिकांमध्ये सतर्कता तसंच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

हेही पहा-

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.