आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तयारीला लागली असून, स्वपक्षातील ९ मंत्र्यांना जनता दरबार घेण्याची सूचना करण्यात आली आहे. शिवाय महत्त्वाच्या नेत्यांवर लोकसभानिहाय आणि जिल्हावार दौरे करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
(हेही वाचा – PM Gati Shakti : पीएम गतीशक्ती अंतर्गत पायाभूत सुविधांच्या ६ प्रकल्पांची शिफारस)
यासंदर्भात माहिती देताना राष्ट्रवादीच्या अजित पवार (NCP) गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, राज्यात काम करणाऱ्या पदाधिकार्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. पक्षाची ध्येयधोरणे आणि राज्यव्यापी उभे राहणारे संघटन अशा वेगवेगळ्या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुढच्या आठवड्यात बोलवणार आहे. आणि त्यानंतर पक्षाच्या कामाची व संघटनेची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने एक कालबद्ध कार्यक्रम ठेवणार आहोत, असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
लोकसभानिहाय राज्याचा दौरा केला जाणार आहे. राज्यातील महत्त्वाच्या (NCP) नेत्यांचे जिल्हावार दौरे करण्याबाबतही चर्चा झाली. याशिवाय राज्यात आमचे ९ मंत्री असून त्यांचा जनता दरबारसुध्दा राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात पुढच्या आठवड्यात सुरु करण्यात येतील असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community