Luna – 25 : चंद्रावर पोहोचण्यासाठी लागली शर्यत, रशियाने ४७ वर्षांनी लॉन्च केले यान

यासाठी सोयूज २.१बी या रॉकेटची मदत घेण्यात आली.

164
Luna - 25 : चंद्रावर पोहोचण्यासाठी लागली शर्यत, रशियाने ४७ वर्षांनी लॉन्च केले यान

भारताच्या चांद्रयान ३ पाठोपाठ आता रशियाने देखील आपले ‘लूना-२५’ (Luna – 25) हे यान चंद्रावर पाठवले आहे. त्यामुळे आता चंद्रावर पहिला कोणाचे यान पोहचणार यामध्ये शर्यत लागली आहे. आज म्हणजेच शुक्रवार ११ ऑगस्ट रोजी पहाटे रशियाने आपलं ‘लूना-२५’ हे यान अवकाशात प्रक्षेपित केलं. तब्बल ४७ वर्षांमध्ये रशियाची ही पहिलीच चांद्रमोहीम असणार आहे. या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण भागात उतरण्याचा प्रयत्न रशिया करेल.

रशियाच्या स्पेस (Luna – 25) एजन्सी Roscosmos ने पुष्टी केल्यानुसार, अमूर ओब्लास्टजवळ असणाऱ्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम फॅसिलिटीमधून हे प्रक्षेपण करण्यात आलं. यासाठी सोयूज २.१बी या रॉकेटची मदत घेण्यात आली. रशियाच्या वेळेनुसार शुक्रवारी पहाटे २:११ वाजता यानाचे प्रक्षेपण झाले.

(हेही वाचा – Nawab Malik : नवाब मलिकांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर)

सोयूज रॉकेटने ‘लूना-२५’ला (Luna – 25) पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत सोडलं. यानंतर हे यान चंद्राच्या दिशेने निघालं. सुमारे ५.५ दिवसांमध्ये हे यान चंद्राच्या जवळ पोहोचेल. त्यानंतर चंद्राच्या कक्षेमध्ये हे यान सुमारे तीन ते सात दिवस असणार आहे. साधारणपणे २१ किंवा २२ तारखेला हे यान चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.

युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ने लुना -२५ वर मॉस्कोला सहकार्य करणार नाही असे सांगितल्यानंतर, रशिया (Luna – 25) चीनसोबत जाण्याचा विचार करत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.