sports player : पुणे येथे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. त्या विद्यापीठामध्ये जपानची मदत घेऊन राज्यातील खेळाडूंना क्रीडा वैद्यकीयशास्त्र sports player आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशिक्षण देण्यासंदर्भात क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जपानचे शिष्टमंडळ यांच्यात सविस्तर चर्चा झाली.
महाराष्ट्राचे क्रीडा sports विद्यापीठ आणि जपानचे क्रीडा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जपानमध्ये झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेनंतर तेथील ऑलिंपिक वस्तू संग्रहालयाच्या धर्तीवर पुणे येथील होऊ घातलेल्या भव्य अशा ऑलिंपिक भवनात ऑलिंपिक संग्रहालय तयार करता येऊ शकेल, यावरही चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळात मुंबईचे कौन्सुल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता, डेप्युटी चीफ ऑफ मिशन कनेक तोशिहिरो, पोलिटिकल सेक्शन रिसर्चर शिमादा मेगुमी तसेच आमदार बाबासाहेब पाटील उपस्थित होते.
(हेही वाचा –Maharashtra : आमदार किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा – पत्रकार संघटनांची राज्यपालांकडे मागणी
जपानने तंत्रज्ञान, पर्यावरण, क्रीडा क्षेत्रात भरीव काम केले. त्यामुळे जापान आज क्रीडाक्षेत्रात अग्रेसर देश आहे. तसेच जपान हा शिस्तप्रिय, पर्यावरणपूरक जीवनपद्धती, बुद्धीजम मानणारा देश आहे. त्यामुळे बुद्धीजम, क्रीडा, बंदरे, युवक कल्याण अशा विषयांवर जपानसोबत काम करता येईल, असे मत मंत्री बनसोडे यांनी व्यक्त केला.
जपानच्या शिष्टमंडळाने सकारत्मक प्रतिसाद देत, भारत- जपान संबंध दृढ करण्याची ही योग्य वेळ असल्याचे मत जपानचे कॉन्सुल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता यांनी व्यक्त केले. लवकरच या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यासाठी जपान उत्सुक असल्याचे शिष्टमंडळ सदस्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community