BMC : कुलाब्यातील मलजल प्रक्रिया केंद्रातील पाणी पिण्यायोग्य : ‘या’ सल्लागार कंपनीची निवड

147

कुलाबा येथील मलजल प्रक्रिया केंद्रातील सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते पाणी पिण्यायोग्य बनण्यासाठी महापालिकेने आता पुढाकार घेतला असून या प्रकल्प कामांसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. या सांडपाण्याचा पिण्यायोग्य पाण्याचा वापर करण्यासाठी हाती घेण्यात महापालिकेने एनजेएस इंजिनिअर्रींग इंडिया या कंपनीची निवड केली आहे. या सल्लागार सेवेसाठी या कंपनीवर पावणे पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

मुंबईतील सध्याच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठी तसेच शाश्वत पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक पध्दतींनी मुंबईच्या पाणी पुरवठा वाढवण्यासाठी कुलाबा येथील ३७ दशलक्ष लिटर क्षमतेच्या मलजल प्रक्रिया केंद्रातील पाण्यापैकी १२ दशलक्ष लिटर पुनर्प्रक्रिया करून जलशुध्दीकरण प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत सर्व तांत्रिक सर्वेक्षण, प्रकल्पांसाठी जागेच्या वापराची खातरजमा करणे, या प्रकल्प कामांच्या निविदा मागवणे आदी कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

(हेही वाचा Flag Hosting : शिंदे-फडणवीसांवर अजितदादा ‘भारी’; ध्वजारोहणासाठी काढलेले परिपत्रक बदलण्याची वेळ)

या सल्लागार सेवांसाठी एनजेएस इंजिनिअर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि ग्रीन डिजाईन व इंजिनिअरींग सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आदींच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. यातील ग्रीन डिजाईन कंपनीकडे मलजल प्रक्रिया केंद्रातील सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्या पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठीच्या प्रकल्पाचा अनुभव नसल्याने तसेच ७ दशलक्ष लिटर क्षमतेचा एकही प्लांट नसल्याने या निकषात ही कंपनी बाद ठरली आहे. त्यामुळे एनजेएस इंजिनिअर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला १०० गुण प्राप्त झाल्याने महापालिकेच्या ६ कोटी २९ लाख ६६ हजार रुपयांच्या तुलनेत ४ लाख ५७ लाख रुपये एवढ्या किंमतीत २७ टक्के कमी बोली लावल्याने ही कंपनी पात्र ठरली आहे.

प्रक्रिया केलेल्या मलजलाच्या नमुन्यांवर विविध चाचण्या करणे हे आवश्यक असून या चाचण्यांचे अचूक व विश्वासार्ह परिमाण होणे अत्यंत आवश्यक आहे. यापूर्वी भारतात कुठेही न झालेले असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवी तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज असल्या या कामांसाठी नितांत गरज आहे. ही कंपनी डेविड स्लॉन आणि विराज डिसिल्व्हा या तज्ञांमार्फत सल्ला उपलब्ध करून देणार आहेत. या कंपनीने २००९ पासून महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजनको) नागपूर येथे मलजल प्रक्रिया केंद्रातील पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते पाणी पिण्यायोग्य वापरासाठी बनवण्याचा प्रकल्प राबवला असल्याने या कंपनीची सल्लागार सेवेसाठी निवड करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.