BMC : रुग्णालयांना भेटी देता तर रुग्ण खाटांप्रमाणे कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवा : युनियनची महापालिका प्रशासनाकडे मागणी

359

गेल्या काही वर्षामध्ये मुंबईसह इतर परिसरांमध्ये लोकसंख्या दुपटीहून अधिक प्रमाणात वाढली असल्याने रुग्णसंख्येतही प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. मात्र, या वस्तुस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने मुंबईकरांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला आहे. रुग्णवाढीच्या प्रमाणात रुग्णलयांतील आवश्यक मुनष्यबळ वाढविण्याची तसदी प्रशासनाने आजतागायत घेतलेलीच नाही. दुर्दैवाने एखादी अप्रिय घटना घडली तर एखाद्या परिचारिकेचा अथवा कामगार कर्मचाऱ्याचा बळी दिला जातो. त्यामुळे औद्योगिक न्यायप्राधिकरणाने सुचित केल्याप्रमाणे रुग्णखाटांप्रमाणे कर्मचारी संख्येचे प्रमाण अंमलात आणण्याची मागणी दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याकडे निवेदन केले.

मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर महापालिकेच्या विविध रुग्णालयांना भेटी देऊन मुंबईच्या जनतेला देण्यात येणारी वैद्यकीय सेवा आणि रुग्णालयातील एकूणच कामकाज जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांचे स्वागत दि म्युनिसिपल युनियनने केले आहे.

मुंबई महानगरपालिका वर्षाचे ३६५ दिवस ऊन-वारा, अतिवृष्टी, पाऊस, बॉम्बस्फोट, दंगली, कोणतीही परिस्थिती असो, अहोरात्र विविध रुग्णालयाच्या माध्यमातून मुंबईकर जनतेला आरोग्यसेवा देत आहे. गेल्या काही वर्षामध्ये मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये लोकसंख्या दुपटीहून अधिक प्रमाणात वाढली असल्याने रुग्णसंख्यासुद्धा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या वस्तुस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने मुंबईकरांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला आहे. रुग्णवाढीच्या प्रमाणात रुग्णलयांतील आवश्यक मुनष्यबळ वाढविण्याची तसदी प्रशासनाने आजतागायत घेतलीच नाही. दुर्दैवाने एखादी अप्रिय घटना घडली तर एखाद्या परिचारिकेचा अथवा कामगार कर्मचाऱ्याचा बळी दिला जातो.

(हेही वाचा BMC : अतिरिक्त आयुक्तांच्या महापालिका रुग्णालयांमध्ये वाढल्या फेऱ्या; रुग्णालयांमध्ये स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तनात सुधारणा दिसतेय?)

महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयातील कोणत्याही वॉर्डची स्थिती पाहता, प्रत्येक वॉर्डात असलेल्या बेडशिवाय मोकळ्या जागांमध्ये अतिरिक्त बेडची सोय करण्यात आलेली आहे आणि त्यावर दोन – दोन रुग्ण ठेवण्यात आलेले आहेत. त्यांची सुश्रूषा करण्यासाठी एखादी परिचारिका व कक्ष परिचर तथा आया नेमण्यात आलेली आहे. १०० हून अधिक संख्या असलेल्या रुग्णांसाठी एक किंवा दोन परिचारिका तसेच कक्ष परिचर / आया नेमल्याने रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेवर त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे या निवेदनात म्हटले.

दि म्युनिसिपल युनियनने वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधून रुग्णशय्या कर्मचारी संख्या प्रमाण या संबंधात इंडियन मेडिकल कौन्सिल, इंडियन नर्सिंग कौन्सिल आणि सलिम एम. मर्चंट यांच्या औद्योगिक न्यायाप्राधिकारणाने दिनांक २८.४.१९४९ रोजी दिलेल्या व मुंबई महानगरपालिकेला लागू असलेल्या निवाड्यानुसार लागू करण्याबाबत विनंती केलेली आहे. परंतु त्याबाबत आजतागायत काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.

त्यामुळे आपण स्वतः लक्ष घालून, मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खाते व सार्वजनिक व उपनगरीय रुग्णालयात इंडियन मेडिकल कौन्सिल, इंडियन नर्सिंग कौन्सिल आणि सलिम एम. मर्चंट यांच्या औद्योगिक न्यायाप्राधिकारणाने सूचित केल्याप्रमाणे रुग्णशय्या कर्मचारी संख्या प्रमाण अंमलात आणून मुंबईकर नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्यसेवीची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,अशी मागणी या युनियनच्यावतीने करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.