केंद्र शासनाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश अभियान भगूर नगर पालिकेच्या वतीने भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात राबविण्यात आले, या वेळी भगूर शहरात नगर पालिकेच्या वतीने मशाल रॅली आयोजित करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी स्मारकाच्या प्रांगणात शहरातील बचत गटातील महिलांच्या सहयोगाने 1000 दिवे लावून स्मारक दिव्यांची आरास करण्यात आली.
यावेळी स्मारक दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले. या प्रसंगी मुख्याधिकारी अमोल चौधरी यांच्या हस्ते वीर सावरकरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी विक्रम सोनवणे, फरीद शेख, संजय शिंदे, स्वाती झुटे, अनिता ढगे, संग्राम करंजकर, सुदाम वालझाडे नगर पालिकेचे कर्मचारी केयूर राय, नम्रता गवळी, अभिजित कोशिरे, चित्रा भवरे, शाकीर शेख व स्मारकाचे मनोज कुवर, भूषण कापसे, खंडू रामगडे तसेच शहरातील अनेक महिला व नागरिक उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community